temperature in the state is at 30 degree Celsius


हिवाळ्याचा महिना सुरू असतानाही राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमानाचा पारा हा 30 अंशांच्यावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारपासून (ता. 10 फेब्रुवारी) राज्यातील तापमान बदलाला सुरुवात झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून काही अंशांनी तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असल्याने आता याचा फरक जाणवू लागला आहे.

मुंबई : हिवाळ्याचा महिना सुरू असतानाही राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमानाचा पारा हा 30 अंशांच्यावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारपासून (ता. 10 फेब्रुवारी) राज्यातील तापमान बदलाला सुरुवात झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून काही अंशांनी तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असल्याने आता याचा फरक जाणवू लागला आहे. नागरिकांना रात्री आणि पहाटेच्या वेळी गार वारा अनुभवायला मिळत असून सकाळी 10 वाजताच्यानंतर मात्र उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. फेब्रुवारीतच तापमानाचा पारा 36 अंशांच्या पुढे जात असल्याने यंदा उन्हाळा तीव्र राहणार असल्याची चाहूल लागली आहे. (Maharashtra Weather: temperature in the state is at 30 degree Celsius)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. पहाटेचा गारवा सोडल्यास यंदा राज्यात फारशी थंडी जाणवली नाही. गेल्या 48 तासामध्ये पुणे शहरात तापमानात मोठे बदल झाले असून शहराचा सरासरी पारा 35 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. पुणे शहर देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत गेले आहे. 1 फेब्रुवारीला पुण्यातील कोरेगाव पार्क कमाल तापमान 31.5 अंश सेल्सिअस होते. आठ फेब्रुवारीला तब्बल 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील सर्वाधिक तापमान पुणे शहरात असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातूनही दिसून येत आहे.

हेही वाचा… Mantralay : भंगार, राडारोड्याचा ढीग, कचऱ्याच्या ढिगामुळे मंत्रालयाची रया गेली

तर, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तासांमध्ये तापमानात फार मोठे बदल होणार नसून हळूहळू 1-2 अंशांनी तापमान घटणार आहे. राज्यातील उत्तरी भागात किमान तापमानात 1-2°Cची घट पुढील 24 तासांत होण्याचा अंदाज आहे. तर पुढील 2-3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमान घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात कमाल तापमान पुढील 3 दिवस 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढेल, त्यानंतर पुन्हा 2 ते 3 अंशाने घटण्याचा अंदाज आहे.

विदर्भात किमान तापमान पुढील 2 दिवस 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2 ते 4 अंशाने घटण्याची शक्यता आहे. मुंबईतही दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 25 अंशाच्या वर जाताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकर उन्हाळा सुरू होण्याआधीच उकाडा सोसू लागले आहेत. परंतु, येत्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा कमी होणार असला तरी यामुळे उन्हाच्या झळा बसणार आहेत. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



Source link

Comments are closed.