मराठी भाषा दिवस आणि शिवराय संचलनाविषयी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची शनिवारी बैठक

येत्या 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा दिवस आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या शिवराय संचलन या दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजनाची रूपरेखा आखण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता  शिवसेना भवन, दुसरा मजला येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते- खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडणार आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे पदाधिकारी व संलग्न असलेल्या सर्व समिती व त्यामधील सर्व आस्थापनांतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Comments are closed.