आंध्र प्रदेशात विद्यार्थ्यांनी बलात्कार केला, तीन अटक

अमरावती :

आंध्रप्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यातील कांचीचेरला येथील परिताला गावात मंगळवारी बलात्काराची घटना उघडकीस आली. एका 19 वर्षीय विद्यार्थिनीवर तीन युवकांनी वारंवार बलात्कार केला आहे. शेख हुसैन, शेख गली शाहिद अशी आरोपींची नावे आहेत. तसेच या दोन्ही मुख्य आरोपींना मदत करणाऱ्या चिंतल प्रभू दासलाही पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तपास केला जात असून आरोपींच्या विरोधात आवश्यक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Comments are closed.