जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा धक्का, कुणाला संधी मिळाली?
जसप्रिट बुमराह, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नवी दिल्ली: रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सिडनी कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहला लोअर बॅक इंज्युरीमुळं दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नव्हती. तेव्हापासून जसप्रीत बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रक जारी करत ही घोषणा केली आहे. त्यामध्ये जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत संघाचा सदस्य नसेल, असं सांगण्यात आलं आहे.
हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती लॉटरी
बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रक जारी करत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणाला संधी दिल्याचं स्पष्ट केलं. सलामीवर यशस्वी जयस्वालच्या जागी फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी दिली गेली आहे. यशस्वी जयस्वालचं नाव यापूर्वी जाहीर केलेल्या संघात होतं. मात्र, आयसीसीकडे संघाची नावं सोपवण्याची शेवटची मुदत 11 फेब्रुवारी होती. त्यानिमित्तानं संघात बदल करण्यात आले.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
प्रवास न करणारा पर्याय-
यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने कधी?
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज आहे. भारताची पहिली मॅच 19 फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध होणार आहे.त्यानंतर भारत आणि पाकिस्तान आमने सामने येतील.हा सामना 23 मार्चला होईल. भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सामना 2 मार्च ला होईल. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. तर, इतर संघांचे सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघ सध्या इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळतोय. पहिल्या दोन सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. आज तिसरा सामना होणार आहे. पहिल्या दोन्ही लढतींमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांना छाप पाडता आली नव्हती. मोहम्मद शमी आणि हर्षित राणा यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणं नव्हती. तर, अर्शदीप सिंगला संघात स्थान मिळालं नव्हतं.
https://www.youtube.com/watch?v=2aoknleyzji
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.