अखनूर सेक्टरमध्ये आयईडी स्फोट, 2 सैनिक शहीद

सुरक्षा दलांकडून शोधमोहीम जारी

वृत्तसंस्था/ जम्मू

जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये मंगळवारी एक आयईडी स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन सैनिक हुतात्मा झाले आहेत. हे सैनिक नियंत्रण रेषेवर गस्त घालत असताना हा स्फोट झाला. दहशतवाद्यांनीच हा आयईडी पेरला होता असे मानले जात आहे. हा स्फोट एलओसीवरील पोस्टनजीक झाला आहे. आयईडी स्फोटानंतर भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. तर स्फोटात जखमी झालेल्या एका सैनिकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अखनूर सेक्टरच्या लालेलीमध्ये सीमेवर सैनिक गस्त घालत असताना आयईडीचा स्फोट झाला आणि यात सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले. संबंधित क्षेत्रात सैन्याकडून शोधमोहीम सुरू करत दहशतवाद्यांना पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या स्फोटात व्हाइट नाइट कोरच्या दोन सैनिकांना हौतात्म्य आल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले.

अखनूरमध्ये एलओसीनजीक ज्या चौकीजवळ हा स्फोट झाला, तेथे सैन्याने शोधमोहीम सुरू केली आहे. हा आयईडी स्फोट पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घडवून आणल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Comments are closed.