Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडे

Maharashtra Breaking News Live Updates: लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसताना पाहायला मिळतोय. या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का हा प्रश्न विचारण्याचा कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं जाणार अनुदान गेल्या वर्षभरापासून मिळालच नसल्याचं समोर आलं आहे. जनआरोग्य योजनेची कोट्यावधी रुपयांची बिले गेल्या सहा-सात महिन्यापासून थकीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 53 कोटींची बिले थकीत आहेत तर सांगली जिल्ह्यामध्ये 36 कोटीची बिले थकीत आहेत. तसेच माजी मंत्री तानाजी सांवत यांचा मुला ऋषिराज सावंत यांच्या बँकॉक दौऱ्याबाबतही विविध अपडेट्स समोर येत आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स…

Comments are closed.