ओपनएआय खरेदीसाठी मस्क यांची 84 हजार कोटींची ऑफर
अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी ओपनएआय खरेदी करण्यासाठी 9.74 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 84 हजार 600 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. ही ऑफर मस्क यांच्या एआय कंपनी एक्सएआय व्हॅलर इक्विटी पार्टनर्स, बॅरन कॅपिटल सारख्या गुंतवणूकदारांनी दिली आहे. मस्क यांचे वकील मार्क टोबेरोफ यांच्यामार्फत ओपनएआयच्या बोर्डाला ही ऑफर देण्यात आली. परंतु, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली आहे.
सॅम ऑल्टमन यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये म्हटले की, नाही धन्यवाद, जर तुम्हाला हवे असेल तर आम्ही एक्स 9.74 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 84 हजार कोटी रुपये देऊन खरेदी करू शकतो. याला मस्क यांनी प्रत्युत्तर देत ऑल्टमन यांना स्कॅम ऑल्टमन असे म्हटलेय. ओपनएआय हे 11 डिसेंबर 2015 रोजी लाँच केले. याची सुरुवात एलन मस्क, सॅम ऑल्टमन, ग्रेग ब्रॉकमन, इल्या सुत्स्केव्हर, वोज्सिएच झारेबा, जॉन शुलमन यांसारख्या तांत्रिक तज्ज्ञ आणि एआय संशोधकांनी केली होती. 2024 मध्ये कंपनीसाठी 57,167 कोटी रुपये उभारण्यात आले, त्यानंतर कंपनीचे मूल्यांकन 13.60० लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
पाच वर्षात ओपनएआयचा रिवेन्यू
२०२० – ३०.१६ कोटी रुपये
२०११ – ३१४ कोटी रुपये
२०२२ – १७३२ कोटी रुपये
२०२३ – ११,२६२ कोटी रुपये
२०२४ – ३४,६५४ कोटी रुपये
ओपनएयाची उत्पादने
२०२० मध्ये जीपीटी-३ लाँच
२०२१ मध्ये डॅल-ई, एक जनरेटिव्ह एआय मॉडल लाँच
२०२२ मध्ये चॅटजीपीटी लाँच केले. हे जगातील सर्वात प्रगत चॅटबॉट आहे. अवघ्या पाच दिवसात १० लाख यूजर्स मिळाले.
मस्क यांनी ट्विटर खरेदी केले
एलन मस्क यांनी २७ ऑक्टोबर २०२२ रोजी ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केले. आज याची किंमत ३.६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ट्विटर खरेदी केल्यानंतर सीईओ पराग अग्रवाल, नेड सेगल, विजया गुड्डे, शॉन एजेट यांना काढून टाकले. ७ हजार ५०० कर्मचाऱ्यांऐवजी आता केवळ अडीच हजार कर्मचारी आहेत.
Comments are closed.