आका सापडला का? बीडवरून आदित्य ठाकरे यांचा सवाल
![aaditya thackeray matoshree](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/aaditya-thackeray-matoshree-696x447.jpg)
आका सापडले का? असा सवाल करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज बीडवरून महायुती सरकारला खरमरीत सवाल केला.
तानाजी सावंत यांच्या मुलाला शोधण्यासाठी महाराष्ट्रासह दिल्लीची यंत्रणा कामाला लागली त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी सरकारी यंत्रणा काम करेल का, असे पत्रकारांनी विचारले असता आका कोण तो सापडला का पोलिसांना? असा प्रतिसवाल आदित्य ठाकरे यांनी केला. ‘आमदार सुरेश धस, नमिताताई संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सातत्याने आवाज उठवत आहेत. संपूर्ण बीड आक्रोश करत आहे. सगळे पुरावे असतानादेखील मंत्रिमंडळात काहीच हालचाल होत नाही. परभणीतही तसाच आक्रोश होत आहे; पण मुख्यमंत्री फडणवीस त्यावर काहीच बोलत नाहीत हे दुर्दैव आहे,’ असे ते म्हणाले.
Comments are closed.