टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक
टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुरुष गटात पश्चिम बंगालच्या बलाढय़ खेळाडूंना चिवट लढत दिली, मात्र हा सामना 0-3 असा गमवावा लागल्याने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
परेड मैदानाजवळील इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जश मोदी याने अर्निबन घोष याला चिवट झुंज दिली, मात्र अखेर त्याने हा सामना 7-11, 12-10, 11-6, 4-11 असा गमावला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला, मात्र अखेर बंगालच्या खेळाडूने बाजी मारली. महाराष्ट्राच्या रेगन अल्बुकर्क याला बंगालच्या आकाश पाल याने 11-5, 11-8, 12-10 असे सहज हरविले. आकाशने काऊंटर अटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. महाराष्ट्राच्या चिन्मय सोमय्या याला सौरव शाह याने 11-7, 11-8, 8-11, 11-8 असे पराभूत करीत बंगालच्या विजेतेपदावर मोहोर नोंदविली.
Comments are closed.