पॅट कमिन्स पाठोपाठ मिशेल स्टार्क चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, ऑस्ट्रेलियाला धक्के सुरुच
चॅम्पियन्स ट्रॉफी ऑस्ट्रेलिया पथक सिडनी: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे.त्यामुळं भारताला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क देखील वैयक्तिक कारणामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला तिहेरी धक्का बसला आहे. कारण, यापूर्वी कॅप्टन पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि आता मिशेल स्टार्क बाहेर पडल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीत आस्टेलियाच्या संघासमोर मोठं आव्हान उभं राहील. ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानं स्पर्धेबाहेर गेले आहेत.
आयसीसीनं त्यांच्या वेबसाईटवर ऑस्ट्रेलियन टीम संदर्भातील अपडेट शेअर केली आहे. मिशेल स्टार्क वैयक्तिक कारणामुळं ऑस्ट्रेलियन टीमच्या बाहेर गेल्याची माहिती आहे. आता तो चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही. मिशेल स्टारक बाहेर झाल्यानंतर ऑस्ट्रेलियानं संघात नव्या खेळाडूंना स्थान दिलं आहे. सीन एबॉट अन् बेन ड्वारशुइस यांना स्थान देण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियाचं कॅप्टनपद स्टीव्ह स्मिथकडे
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स दुखापत ग्रस्त झाल्यानं स्पर्धेला मूकणार आहे. दुसरीकडे जोश हेझलवूड देखील दुखापतग्रस्त असल्यानं या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मिशेल मार्श, मार्कस स्टोईनिस पाठोपाठ मिशेल स्टार्कनं देखील वैयक्तिक कारणामुळं स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियानं कॅप्टन म्हणून स्टीव्ह स्मिथची निवड केली आहे.
ऑस्ट्रेलियानं एबॉटसह जॅक फ्रेजर-मॅक्गर्कला स्थान दिलं आहे. मॅक्गर्कनं भारतातील आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती.त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळालं होतं. तनवीर सांघा आणि स्पेन्सर जॉनसन यांना देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. बेन ड्वारशुइस याला देखील संघात स्थान मिळेल.
ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ: स्टीव स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, बेन ड्वारशुइस, नाथन एलिस, जेक फ्रेजर-मॅक्गर्क, आरोन हार्डी, ट्रॅविस हेड, जोश इंगलिस, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, मैथ्यू शॉर्ट, एडम झम्पा.
राखीव खेल्डू: कूपून
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील प्रमुख दावेदार म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं जात होतं. मात्र, आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या पाच प्रमुख खेळाडूंनी माघार घेतलीय किंवा ते दुखापतग्रस्त झालेत. यामुळं ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं. या स्पर्धेपूर्वी अनेक संघांचे वेगवान गोलंदाज दुखापतीचा सामना करत असल्याचं पाहायला मिळतं.
इतर बातम्या :
अधिक पाहा..
Comments are closed.