चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का, फिरकी हुकमी एक्का बाहेर!

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व  8 देशांच्या संघांची घोषणा खूप आधी करण्यात आली होती. सर्व संघांना आयसीसीने 12 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या संघात परवानगीशिवाय बदल करण्याची वेळ दिली आहे. दरम्यान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर, अफगाणिस्तानचे नावही त्यांच्या संघात बदल करणाऱ्या संघांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. 12 फेब्रुवारी रोजी, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या 18 वर्षीय गूढ फिरकी गोलंदाज अल्लाह गझनफरच्या बदली खेळाडूचे नाव जाहीर केले, जो दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आज 12 फेब्रुवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले. ज्यामध्ये अल्लाह गझनफरच्या बदली खेळाडूचे नाव जाहीर केले. बोर्डाने प्रवासी राखीव संघात समाविष्ट असलेल्या नांगेयालिया खारोटेला मुख्य संघाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान क्रिकेटने अल्लाह गझनफरला वगळण्याचे कारण देखील उघड केले. फ्रॅक्चरमुळे गझनफरला बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याला पूर्ण तंदुरुस्तीसाठी किमान चार महिने लागतील. याशिवाय, आधीच अनफिट असलेला मुजीब उर रहमान पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतू शकेल.

20 वर्षीय नांगेयाली खारोटेबद्दल बोलायचे झाले तर तो एक स्पिन अष्टपैलू खेळाडू आहे. नांगेलियाने आतापर्यंत अफगाणिस्तान संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 7 एकदिवसीय आणि 6 टी20 सामने खेळले आहेत. या एकदिवसीय सामन्यात त्याने फलंदाजीत 41 धावा केल्या आहेत. तर 11 बळीही घेतले आहेत. याशिवाय, टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात, नांगेलिया खारोटेने 7 धावा देण्यासोबतच 5 बळी घेतले आहेत. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अफगाणिस्तान संघाला गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यामध्ये त्यांचा पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

हेही वाचा-

रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट! 3 संघ ठरले, चौथा संघ लवकरच जाहीर
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघात धक्कादायक बदल, सामना फिरवणारा गोलंदाज बाहेर
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: टीम इंडियाचा फिरकी गेमप्लान, या 5 फिरकीपटूंना संघात स्थान

Comments are closed.