IND vs ENG; इंग्लंडने जिंकला टाॅस गोलंदाजीचा निर्णय, टीम इंडियात तीन मोठे बदल

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (12 फेब्रुवारी) खेळला जात आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगत आहे. या सामन्यात इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजे टीम इंडिया पहिल्या डावात खेळताना दिसणार आहे. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाल्यास इंग्लंड संघात एक बदल तर भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्लेइंग इलेव्हन मधून वगळण्यात आले आहे.

दोन्ही संघाच्या प्लेइंग 11-

इंडिया- रोहित शर्मा (कर्नाधर), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यशक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हरशीट राणा, कुल्दीप यादव, अरशदीप सिंग

इंग्लंड- फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), टॉम बँटन, लियाम लिव्हिंगस्टोन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद

या सामन्यात भारतीय चाहत्यांना पुन्हा एकदा ‘हिटमॅन’ रोहितकडून एका दमदार खेळीची अपेक्षा असेल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक (119) झळकावून तो फॉर्ममध्ये परतला. या सामन्यात, सर्वांच्या नजरा खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीवर असतील. कटकमध्ये त्याला फक्त 5 धावा करता आल्या.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आधीच मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारत इंग्लंडला व्हाईटवॉश करण्याचा प्रयत्न करेल, दुसरीकडे जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ मालिकेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे.

हेही वाचा-

IND vs ENG: आजच्या सामन्यात होणार नवा विक्रम? रोहित-विराटला ऐतिहासिक संधी
CT 2025; भारत-पाकिस्तानसह मोठ्या संघांना धक्का, या 9 खेळाडूंची ट्रॉफीपूर्वी एक्झिट
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का, फिरकी हुकमी एक्का बाहेर!

Comments are closed.