मोठी बातमी: ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरुण विष प्यायला, प्रेयसीचा मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज!
Ish षभ पंत: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी अपघात झाला होता. त्यावेळी रजत नावाच्या तरुणाने ऋषभ पंतचा जीव वाचवला होता. पण आता त्याच रजतने त्याच्या मैत्रिणीसोबत विष प्राशन केले. विषामुळे प्रेयसीचा मृत्यू झाला. तर रजतवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
रजत हा मुझफ्फरनगरमधील शकरपूर येथील मजरा येथील रहिवासी आहे. मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, दोन दिवसांपूर्वी रजतने त्यांच्या मुलीला आमिष दाखवून सोबत नेले. त्यानंतर त्याने त्याला विषारी पदार्थ खायला दिले. मुलीची आईने रजत आणि इतरांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण सध्या रजतची प्रकृती गंभीर असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत गेल्या पाच वर्षांपासून मनू नावाच्या 21 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंधात होता. मात्र दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांना हे नाते मान्य नव्हते. दोघांच्याही कुटुंबियांनी लग्नाला नकार दिला होता. दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचे लग्न दुसऱ्या ठिकाणी अधिकृतपणे ठरवले होते. यामुळे दुःखी होऊन, रजत आणि त्याच्या प्रियसीने 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी शेतात विष प्राशन केले. दोघेही शेतात बेशुद्ध पडले असल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना उत्तराखंडमधील झाब्रेडा येथील नर्सिंग होममध्ये दाखल केले. मंगळवारी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर रजतवर अजूनही उपचार सुरू आहेत.
ऋषभ पंतने दुचाकी दिली होती भेट-
30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी उत्तराखंडमधील रुरकी येथे त्याच्या गावी जात असताना पंतची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. कार पलटी झाल्यावर तिला लगेच आग लागली. हा अपघात खुपच भीषण होता, पण नंतर दोन देवदूत तेथे आले, ज्यांनी पंतचे प्राण वाचवले. खरं तर, अपघातानंतर ऋषभ पंत कसा तरी रक्तबंबाळ अवस्थेत कारमधून बाहेर पडला, त्यानंतर काही मिनिटांतच कार पेटू लागली. अपघातग्रस्त कारजवळून अनेक वाहने गेली. काही लोकांनी व्हिडीओ बनवला आणि तेथून निघून गेले, पण दोन लोक तिथून जात होते आणि त्यांनी पंतला गाडीतून बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये नेले, ज्यांची नावे रजत आणि निशू होती. ऋषभ पंतला वाचवल्यामुळे दोन तरुणांना त्यांने आता एक खास भेट दिली आहे. ऋषभ पंतकडून भेट म्हणून दुचाकी मिळाल्यानंतर रजत प्रसिद्धीच्या झोतात आला. परंतु आता रजत इतके धोकादायक पाऊल उचलेल याची कोणालाही कल्पना नव्हती. आज रजत जीवन आणि मृत्यूची लढाई लढत असल्याचं दिसत आहे.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.