Devendra Fadnavis orders cancellation of boards examination centers approval for copy-free campaign
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. महत्त्वाचे म्हणजे कॉपीमुक्त अभियानासाठी संवदेनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जात आहे. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येणार असून कलम 144 म्हणजेच जमावबंदीच्या अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश आणि परीक्षा केंद्रांच्या 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त आहे. अशातच आता कॉपीमुक्त अभियानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. (Devendra Fadnavis orders cancellation of boards examination centers approval for copy-free campaign)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कॉपीमुक्त अभियानासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. शिक्षण विभागाकडून देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात आली की, इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून 18 मार्चपर्यंत 3,373 परीक्षा केंद्रावर होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत 5,130 परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कॉपीमुक्त परीक्षेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्देश दिले.
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द; शिक्षक आणि कर्मचारी सेवेतून बडतर्फ
राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दिले आहेत. अशा…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 11, 2025
परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. परीक्षा केंद्रावर आणि 100 मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावे. परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, तसेच भरारी पथकाद्वारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे. यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी. तसेच संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठ्या पथकात नेमणूक करावी. या बैठ्या पथकाने परिक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे आणि परिक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
हेही वाचा – मराठी : माझा सत्कार करणारे पवार असले तरीही ते शिंदेंचे जावई, काय म्हणाले एकनाथ शिंदे?
संवेदनशील परिक्षा केद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संवेदनशील परिक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे आणि व्हिडीओ कॅमेराद्वारे पूर्णवेळ निगराणी करावी. यासाठी सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत. महत्त्वाचे म्हणजे यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग-प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहणार आहे. तर शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील, त्यानुसार कामकाज करावे. तसेच इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षेच्या दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान दिले.
हेही वाचा – Raigad DPDC Meeting : बैठकीत शिवसेनेच्या आमदारांना बोलावलंच नव्हतं, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
Comments are closed.