ICC वनडे रँकिंग: गिल चमकला, विराटची मोठी घसरण, रोहितचेही नुकसान

ICC ODI Rankings Update: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान ICC ने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. कटकमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावले पण तरीही त्याला नुकसानाला सामोरे जावे लागले. तर शुबमन गिलला थोडासा फायदा झाला आहे. सतत अपयशी ठरणाऱ्या विराट कोहलीची अवस्था वाईट आहे. तो आता आणखी खाली घसरला आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याचे रेटिंग सध्या 786 आहे. पण आता त्याला भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आव्हान देत असल्याचे दिसून येऊ शकते. यावेळी शुबमन गिलने एका स्थानाची झेप घेतली आहे आणि तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 781 आहे. शुबमन गिलने सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली होती. त्याचा फायदा त्याला होताना दिसत आहे. दरम्यान, रोहित शर्माने एका स्थानाने घसरुन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 773 आहे.

दरम्यान, युवा आयर्लंड खेळाडू हॅरी टेक्टरने दोन स्थानांनी प्रगती करत चौथ्या स्थानावर स्थान मिळवले आहे. त्याचे रेटिंग 737 आहे. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन 736 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीची खराब कामगिरी सुरूच आहे. तो आता दोन स्थानांनी घसरून सहाव्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग 728 आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 721 रेटिंगसह 7 व्या क्रमांकावर आहे, तर वेस्ट इंडिजचा शाई होप 672 रेटिंगसह 8 व्या क्रमांकावर आहे.

अफगाणिस्तानच्या रहमानउल्लाह गुरबाजबद्दल बोलायचे झाले तर, तो 672 रेटिंगसह शाई होपसह संयुक्तपणे 8 व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरने निश्चितच एका स्थानाची झेप घेतली आहे. तो आता 669 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघात धक्कादायक बदल, सामना फिरवणारा गोलंदाज बाहेर
CT 2025; भारत-पाकिस्तानसह मोठ्या संघांना धक्का, या 9 खेळाडूंची ट्रॉफीपूर्वी एक्झिट
IND vs ENG: आजच्या सामन्यात होणार नवा विक्रम? रोहित-विराटला ऐतिहासिक संधी

Comments are closed.