मातोश्रीशी इमान राखलेला निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार

राजन साल्वी यांनी शिवसेना यूबीटी राजीनामा दिला. ठाकरे गटाचे (Shivsena UBT) रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी आज (12 फेब्रुवारी) पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. राजन साळवी गुरुवारी दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांनी अनेक वर्षे आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. परंतु, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादात उद्धव ठाकरे यांनी राऊतांची बाजू उचलून धरल्यामुळे साळवी दुखावले गेले होते. याची परिणती राजन साळवी यांनी पक्ष सोडण्यात झाली आहे. राजन साळवी यांच्या जाण्याने ठाकरे गटाला कोकणात मोठे नुकसान होणार आहे.

संबंधित बातमी:

मराठी Sharad Pawar: शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं केलेलं कौतुक उद्धव ठाकरेंना झोंबलं; राजकारण तापलं, पण नेमकं म्हणाले तरी काय?

अधिक पाहा..

Comments are closed.