उडता चंद्रपूर; एनसीबीची मोठी कारवाई, 3 वर्षात कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त
![pune crime news](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/pune-crime-news-696x447.jpg)
अमली पदार्थ विरोधातील मागील वर्ष भरातील स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईचे आकडे पुढे आले आहेत. 2022 आणि 2023 या वर्षाचा तुलनेत 2024 वर्षात स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आल्याचे दिसत आहे. वर्षभरात झालेल्या कार्यवाहीत एकूण 13 लाख 84 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थात ब्राऊन शुगर, एमडी पावडर, गांजा याचा समावेश आहे. वर्षाभरातील ही कार्यवाही काही प्रमाणात समाधानकारक असली तरी अमली पदार्थ्यांचे जाळे जिल्ह्याभरात पसरले आहे. अगदी ग्रामीण भागात गांजा सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा आहेत. गांजाचा आहारी अल्पवयीन मुले जात असल्याने चिंताही व्यक्त करण्यात येत आहे.
काय सांगतेय आकडेवारी?
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तीन वर्षाची आकडेवारी धक्कादायक ठरली आहे. 2022 मध्ये 3374180 लाखांचा गांजा जप्त केला गेला. तसेच बारा प्रकरणात 17 आरोपीना पोलिसांनी अटक करण्यात आली.
2023 या वर्षभरात 3732495 रुपयाचा गांजा आणि अमली पदार्थ जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं. यामध्ये 165.264 किलो ग्राम गांजा,174 ग्राम चरस,डोडा पावडर 1.518 की. ग्राम, एमडी पावडर 198 ग्राम यांचा समावेश आहे. याप्रकरणी 46 आरोपीना अटक करण्यात आली.
2024 वर्षात 13लाख 84 हजार 430रुपयाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. यात 125.699.074 की. ग्र. गांजा जप्त करण्यात आला.7.12 ब्राऊन शुगर, एमडी पावडर 22.808 ग्राम जप्त करण्यात आला होता. 28 कार्यवाहीमध्ये 45 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Comments are closed.