Dada Bhuse criticized Sanjay Raut for feeling sick again after Sharad Pawar praised Eknath Shinde


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी आता शिवसेना नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला जायला नको होते. आम्हाला शरद पवार यांचे दिल्लीतले राजकारण माहिती नाही. परंतु, आम्हाला पवारांचे राजकारण कळते, असे म्हणत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी आता संजय राऊतांवर टीका होताना दिसत आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही संजय राऊतांवर टीका केली आहे. (Dada Bhuse criticized Sanjay Raut for feeling sick again after Sharad Pawar praised मराठी)

संजय राऊत याचं नाव न घेता दादा भुसे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अथक कष्ट करत शून्यातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने दिल्ली येथे शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या गोष्टीचा महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे. परंतु काही लोकांच्या पोटात कायमचा गोळा आहे. एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व एकत्र असतानाही त्यांच्या (संजय राऊत) पोटात गोळा होता. रोज त्यांची मळमळ बाहेर येते. कारण ते मातोश्रीची भाकरी खातात आणि शरद पवारांची चाकरी करतात. मात्र एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांनी गौरव केल्यामुळे यांच्या पोटात पुन्हा गोळा उठला. त्यामुळे त्यांच्याबद्दल (संजय राऊत) न बोललेलेच बरे. तू असाच जळत रहा, एवढेच मी बोलेन, असा टोलाही दादा भुसे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत लगावला.

हेही वाचा – मराठी : आतापर्यंत वंदनीय असणाऱ्या शरद पवारांवरच राऊतांची टीका, एकनाथ शिंदेचा टोला

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना थेट शरद पवारांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जायला नव्हते पाहिजे, ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आता आम्ही कोणत्या तोंडाने जाणार आहोत. राजकारणात कुणी-कुणाचा शत्रू नसतो. मात्र ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारचे सन्मान शरद पवार यांनी देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानीला धक्का आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहा यांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशा लोकांचा आपण सत्कार केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच वेदना झाल्या. आम्हाला शरद पवार यांचे दिल्लीतले राजकारण माहिती नाही. परंतु, आम्हाला शरद पवार यांचे राजकारण कळते, असे म्हणत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा – Maharashtra Politics : संजय राऊतांची शरद पवारांवर घणाघाती टीका, शिवसेनेने दिले प्रत्युत्तर



Source link

Comments are closed.