झुकरबर्गला पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली
फेसबुक पोस्टमुळे ईशनिंदा झाल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानने मला फाशीची शिक्षा सुनावली होती, असा खुलासा मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका मुलाखतीत बोलताना केला. फेसबुकवर पोस्ट झालेल्या एका पह्टोवरून खटला चालवण्यात आला होता. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत पाकिस्तानमध्ये कोणतीही चुकीची कृती खपवून घेतली जाणार नाही. ईशनिंदेबाबत पाकिस्तानात खूप कडक कायदे आहेत, असे झुकरबर्ग यांनी सांगितले.
Comments are closed.