चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकीपिंग कोण करणार? गौतम गंभीरच्या वक्तव्यामुळे ऋषभ पंतची उडाली झोप

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम इंडिया विकेटकीपर: एकतर्फी झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 142 धावांनी धुव्वा उडवला. या शानदार विजयासह भारताने इंग्लंडला ‘क्लीन स्वीप’ देताना तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेद्वारे भारतीय संघाची प्लेइंग-11 देखील काही प्रमाणात स्पष्ट झाली आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये केएल राहुलला (Kl Rahul) यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळाली, तर ऋषभ पंतला (Rishabh Pant) बाहेर बसावे लागले.

अशा परिस्थितीत, आगामी स्पर्धेसाठी केएल राहुल हा कर्णधार आणि प्रशिक्षकाची पहिली पसंती असेल असे मानले जाते. गुरुवारी झालेल्या शेवटच्या सामन्यानंतर, जेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यातील त्यांच्या पसंतीच्या यष्टीरक्षकाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, राहुल हा संघाचा पहिला पसंतीचा यष्टीरक्षक असेल आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतचा अंतिम अकरा खेळाडूंमध्ये पर्याय म्हणून लगेच विचार केला जाणार नाही.

पंतला मिळाली नाही संधी….

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये पंत हा एकमेव खेळाडू होता, ज्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये राहुलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, परंतु त्यात तो काही खास करू शकला नाही. तिसऱ्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने 29 चेंडूत 40 धावांचे उपयुक्त योगदान दिले. भारताने हा सामना 142 धावांनी जिंकला.

सामन्यानंतर गंभीर म्हणाला, राहुल सध्या आमचा नंबर वन यष्टीरक्षक आहे आणि मी आत्ता एवढेच सांगू शकतो. ऋषभ पंतला संधी मिळेल पण सध्या राहुल चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही दोन यष्टीरक्षक फलंदाजांसह खेळू शकत नाही.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये अक्षर पटेलला नंबर वनवर पाठवण्याच्या निर्णयावर गंभीर काय म्हणाला?

पहिल्या दोन सामन्यांमध्ये अक्षर पटेलला राहुलऐवजी मैदानात उतरवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना गंभीर म्हणाला की, पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करणाऱ्या राहुलपेक्षा संघाचे हित जास्त महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, आपण सरासरी आणि आकडेवारी पाहत नाही. कोणता खेळाडू चांगली कामगिरी करू शकतो हे पाहत होतो.

हे ही वाचा –

Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया ‘या’ संघांसोबत खेळणार नाही सामने!

अधिक पाहा..

Comments are closed.