विक्की कौशलचा ‘छावा’ उद्या प्रदर्शित होणार

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर बनवलेला ‘छावा’ चित्रपट उद्या 14 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची आतापर्यंत 2 लाखांहून अधिक तिकीट विक्री झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यात सर्वात जास्त प्री बुकिंग झाली आहे. छावाचे बजेट 130 कोटी रुपये असून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Comments are closed.