RCB च्या नेतृत्वाची नवी धुरा कोणाच्या हाती? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ आज ( 13 फेब्रुवारी ) आयपीएल 2025 साठी कर्णधाराची घोषणा करेल. गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस आरसीबीचे नेतृत्व करताना दिसला होता. परंतु संघाने त्याला आयपीएल 2025 साठी कायम ठेवले नाही, शिवाय मेगा ऑक्शनमध्येही पुन्हा खरेदी केले नाही. आता संघ आज 18 व्या हंगामासाठी कर्णधाराची घोषणा करेल.
आरसीबी आज म्हणजेच गुरुवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता आयपीएल 2025 साठी आपला कर्णधार जाहीर करेल. आयपीएल 2025 साठी आरसीबीच्या कर्णधारपदासाठी विराट कोहलीचे नाव सर्वात वरती असल्याचे दिसते. कोहलीने 2021 पर्यंत संघाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर कोहलीने कर्णधारपद सोडले. यानंतर फाफ डु प्लेसिसने संघाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. आता 2025 मध्ये, डू प्लेसिस दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल. दरम्यान, चाहते असा अंदाज लावत आहेत की विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो.
आता यावेळी संघ कोणत्या खेळाडूला कर्णधार म्हणून निवडतो हे पाहणे रंजक ठरेल. कोहली व्यतिरिक्त, भारतीय फलंदाज रजत पाटीदारचे नावही कर्णधार म्हणून चर्चेत असल्याचे दिसते आहे. पाटीदारला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. याशिवाय, पाटीदार देखील आरसीबीसाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहे.
आयपीएल 2025 साठी आरसीबी संघ – विराट कोहली, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, स्वप्नील सिंग, नुवान तुषारा, मनोज भंडागे, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
हेही वाचा –
आता दुबईत फडकणार तिरंगा; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा जबरदस्त फॉर्म
विश्वविक्रम करण्यापासून हुकला बाबर आझम! केवळ 10 धावा राहिला दूर
टीम इंडियाची अष्टपैलू कामगिरी; मालिका विजयावर रोहित शर्मा काय म्हणाला?
Comments are closed.