2 कोटी भक्त माघी पूर्ण्यावर पवित्र बाथ घेतात
भाविकांवर मुस्लिमांकडून पुष्पवर्षाव : 10 लाख कल्पवासी झाले रवाना
Vrtasantha/ Prigaigraj
महाकुंभमध्ये माघी पौर्णिमेला 2 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती प्रशासनाने बुधवारी दिली. प्रयागराजमध्ये संगमपासून 15 किलोमीटरपर्यंत चहुबाजूला भाविकांची गर्दी दिसून आली. भाविकांच्या या अलोट गर्दीवर हेलिकॉप्टरमधून 25 क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर शहरातील मशिदीबाहेर जमलेल्या मुस्लिमांनी देखील भाविकांवर पुष्पवृष्टी केली आहे. तर दुसरीकडे भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी लेटे हनुमान मंदिर, अक्षयवट आणि डिजिटल महाकुंभ सेंटर बंद ठेवण्यात आले होते. तर महाकुंभमध्ये बुधवारी कल्पवास देखील संपुष्टात आला. संगम स्नानानंतर सुमारे 10 लाख कल्पवासी येथून रवाना झाले.
भाविकांच्या सुरक्षेकरता संगमावर निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तेथे गर्दी होऊ नये म्हणून लोकांना फारवेळ थांबू दिले जात नव्हते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पहिल्यांदाच कुंभमेळ्यात 15 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, 20 आयएएस अधिकारी अणि 85 पीसीएस अधिकारी तैनात करण्यात आले.
तर प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवरील भीषण कोंडीनंतर वाहतूक नियोजनात बदल करण्यात आला. शहरांमध्ये वाहनांना प्रवेश नाकारण्यात आल्याने भाविकांना संगमापर्यंत पोहोचण्यासाठी 8-10 किलोमीटरपर्यंत चालावे लागले आहे. पार्किंगमधून शटल बसेस चालविण्यात आल्या तरीही त्यांची संख्या अत्यंत मर्यादित होती. माघ पौर्णिमा स्नानाचा मुहूर्त संध्याकाळी 7.22 वाजेपर्यंत होता. यादरम्यान 2 कोटीहून अधिक भाविकांनी बुधवारी पवित्र स्नान केले आहे. 13 जानेवारीपासून आतापर्यंत 48.25 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. आता 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिनी अखेरचे स्नानपर्व होणार आहे.
दिग्विजय सिंह महाकुंभमध्ये दाखल
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी संगम येथे पवित्र स्नान पेले तसेच नौकेतून परिसराची पाहणी केली. मागील 3 कुंभपासून मी येथे स्नान करत आलो आहे. महाकुंभमध्ये यापूर्वी जी दुर्घटना घडली, त्याबद्दल मी दु:ख व्यक्त करतो. कुठे ना कुठे त्रुटी राहिली, कारण महाकुंभमध्ये 100 कोटी लोकांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. धार्मिक आयोजनाला इव्हेंट मानले जाऊ नये, कारण हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न असे दिग्विजय यांनी भाजप सरकारला लक्ष्य करत म्हटले आहे.
पौर्णिमेचे स्नान संपन्न : जिल्हाधिकारी
पौर्णिमेचे पवित्र स्नान संपन्न झाले असून भाविक आता येथून रवाना होत आहेत. रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे लक्ष्य आम्ही यशस्वीपणे गाठत आहोत. 14 फेब्रुवारीपासून सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा सुरू होणार असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यास समस्या होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अतिरिक्त वेळ काढून परीक्षा केंद्रांवर पोहोचावे, दुचाकी वाहनांद्वारे केंद्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन प्रयागराजचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार मांदड यांनी केले आहे.
महाकंबमधुन 10 कल्पवसी पाने
संगम तटावर पार पडणाऱ्या या सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यात एक महिन्यापासून प्रवाहित होत असलेला जप, तप आणि साधनेच्या प्रवाहाचे साक्षीदार कल्पवासीयांना माघ पौर्णिमा स्नानानंतर निरोप देण्यात आला. स्नान, दान आणि गंगामातेचा आशीर्वाद घेत 10 लाख कल्पवासी रवाना झाले.
Comments are closed.