व्हॅलेंटाईन डे निमित्त इंडिगोची खास ऑफर

एअरलाईन कंपनी इंडिगोने व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडप्यांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ही ऑफर 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी अशी चार दिवसांच्या मर्यादीत कालावधीसाठी आहे. तिकीट बुक करणाऱ्या जोडप्याला तिकीट खरेदीत 50 टक्के सूट मिळणार आहे. या ऑफरशी संबंधित अधिक माहिती एअरलाईनच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. इंडिगो कंपनी खाण्यापिण्यावरही सूट देत आहे. आधीच जेवण बुक केल्यास 10 टक्के सूट मिळणार आहे. इंडिगोच्या 6ई प्राईम आणि 6ई सीट अँड ईट सारख्या बंडले सेवावर सुद्धा 15 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

Comments are closed.