ई. पलानिस्वामीला मद्रास हायकोर्टाकडून धक्का बसला
अण्णाद्रमुकच्या अंतर्गत कलहाच्या चौकशीला मंजुरी
वृत्तसंस्था/ चेन्नई
मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी स्वत:च्या एका आदेशाद्वारे निवडणूक आयोगाकडून अण्णाद्रमुक पक्षातील अंतर्गत कलहाच्या चौकशीचा मार्ग मोकळा केला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने चौकशीवरील स्थगिती हटविली आहे. अण्णाद्रमुक महासचिव ई. पलानिस्वामी यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. अण्णाद्रमुक पक्ष सध्या पक्षनेतृत्व, पक्षाचे निवडणूक चिन्ह यासारख्या मुद्द्यांवर अंतर्गत वाद अन् कलहाला सामोरा जात आहे.
अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते पी. रविंद्रनाथ तसेच के.सी. पलानिस्वामी आणि पुगाजेंती यांच्या याचिकेवर न्यायाधीश आर. सुब्रमण्यम आणि जी. अरुल मुरुगन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. जुलै 2022 मध्ये अण्णाद्रमुकच्या सर्वसाधारण बैठकीत आणल्या गेलेल्या प्रस्तावाला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले आहे. या प्रस्तावाच्या आधारावर माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आली होती.
Comments are closed.