जानेवारीत महागाईचा दर घटला, एप्रिलमध्ये कर्ज स्वस्त होणार, आरबीआय रेपो रेट पुन्हा घटवणार?
किरकोळ महागाई बातम्या अद्यतन नवी दिल्ली: जानेवारी 2025 महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण झाल्यानं सर्वसामान्यांना आणखी दिलासा मिळू शकतो. एप्रिल महिन्यात आरबीआच्या पतधोरण विषयक समितीची बैठक पार पडेल. या बैठकीत रेपो रेट कमी करण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी 7 फेब्रुवारीला रेपो रेट कमी करण्याची घोषणा केली होती. रेपो रेट 6.50 वरुन 0.25 बेसिस पॉईंटनं घटवून 6.25 टक्के करण्यात आला.आरबीआयनं रेपो रेट कमी केल्यानं कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.
एप्रिलमध्ये कर्ज स्वस्त होणार
जानेवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. महागाईचा दर 4.3 टक्क्यांवर आला आहे. एप्रिल 2025 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होत आहे. एप्रिल महिन्यात आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत महागाईतील घसरणीचा अंदाज घेत रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय होऊ शकतो. सध्या रेपो रेट 6.25 टक्के इतका आहे.
जानेवारी महिन्यात भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्यानं महागाई घटली आहे. चांगल्या रब्बी हंगामामुळं महागाईचा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
नाईट फ्रँक इंडियाचे राष्ट्रीय संचालक विवेक राठी यांनी आरबीआयनं फेब्रुवारीच्या पतधोरण समितीच्या आढावा बैठकीनंतर 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. महागाईच्या दरातील वाढीच्या शक्यतेमुळं आरबीआयनं रेपो रेट मध्ये कपात केली होती. मात्र, त्यापूर्वीच्या 7 तिमाहीमध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरिकांची क्रयशक्ती वाढावी यासाठी व्याज दर कपातीचा निर्णय आरबीआयनं घेतला होता.
एप्रिलमध्ये रेपो रेट घटणार
रायन्सेस प्रायवेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय कुमार यांनी सीपीआय महागाई निर्देशांक 5 टक्क्यांच्या खाली आला आहे, असं म्हटलं. खाद्य पदार्थातील किमती घटल्यानं ही स्थिती पाहायला मिळतेयं. खाद्य पदार्थाच्या किमतीवरील नियंत्रण कायम ठेवून विक्री वाढवण्याचा प्रयत्न आहे. किरकोळ महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत असल्यानं व्याज दरात कपात शक्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
केअरएज रेटिंग्सच्या चीफ अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांनी चौथ्या तिमाहीत आणि येत्या आर्थिक वर्षात 2025-26 मध्ये महागाईचा दर 4.4 ते 4.5 टक्क्यांवर राहणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये 25 बेसिस पॉईंटनं रेपो रेट कमी होऊ शकतात. आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये महागाईचा दर वाढल्यानंतर नोव्हेंबर अन् डिसेंबरमध्ये घसरण झाली आहे. जानेवारीत देखील महागाईच्या दरात घसरण झाली आहे. सर्व गोष्टींचा विचार करता 2024-25मध्ये महागाईचा दर 4.8 टक्के राहील. चौथ्या तिमाहीत 4.4 टक्के महागाईचा दर राहू शकतो.
इतर बातम्या :
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..
Comments are closed.