Fashion Tips : सिम्पल ब्लाउजला द्या डिझायनर लूक

आपण अनेकदा साड्यांसोबत ब्लाउज डिझाइन करतो. हल्ली साड्यांप्रमाणे ब्लाउजच्या डिझाइनचे देखील असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जर तुम्हाला सिम्पल ब्लाउजला स्टयलिश लूक द्याचा असेल तर आज आपण या लेखातून जाणून घेऊयात सिम्पल ब्लाउजला डिझायनर लूक कसा द्याचा.

साहित्य

वायर
नेट फॅब्रिक
ग्लू
शिलई मशीन

ब्लाउजला डिझायनर बनवायची पद्धत

  • यासाठी तुम्हाला सर्वात आधी डिझाइननुसार कापड कापावे लागेल.
  • मग त्याच डिझाइनमध्ये वायर तयार करावी
  • यानंतर ते ग्लूच्या मदतीने चिकटवावे.
  • यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग द्या.

अशा प्रकारे तुमचा ब्लाउज तयार होईल.

ब्लूझला शैली मिळवा

  • जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह लूक पाहिजे असेल तर तुम्ही रेडी टू वेअर साडी स्टाइल करू शकता. यामध्ये तुमचा लूक खूप सुंदर दिसेल.
  • तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लेहंग्यासह देखील हे स्टाइल करू शकता
  • या ब्लाऊजला तुम्ही कोणत्याही ड्रेससह स्टाइल करू शकता.
  • या ब्लाउजमुळे तुमचा लूक सुंदर आणि परिपूर्ण दिसेल.तसेच, तुम्हाला अनेक पर्याय शोधण्याची आवश्यकता नाही. या प्रकारचे ब्लाउज बनवण्याचा तुमचा खर्चही कमी असेल.

डिझाइन ट्रिक्स

तुम्ही काही डिझाइन ट्रिक्स वापरून तुमच्या सिम्पल ब्लाऊजला सुंदर लूक देऊ शकता.

बॅक डिझाइन

डीप यू वी-शेप किंवा दाेरी आणि लेस असलेले ब्लाउज तुम्हाला वेगळा लूक देईल. तसेच तुम्ही कटआउट किंवा नेटचा वापरही करू शकता.

नेकलाइन

तुम्ही नेकलाइन तुमच्या आवडीप्रमाणे शिवू शकता. बोट नेक, हाय नेक, कॉलर नेक किंवा सिंपल डीप नेक स्टाइल ट्राय करू शकता.

स्लीव्हजवर फोकस

तुम्ही स्लीव्हजवर देखील फोकस करू शकता पफ स्लीव्हज, फ्रिल्स, बेल स्लीव्हज किंवा लेस स्लीव्हजचा वापर साध्या ब्लाउजला क्लासिक टच देऊ शकतो.

हेही वाचा : Fashion Tips : नवीन लूकसाठी ट्राय करा हे शर्ट स्टाइल ड्रेसेस


द्वारा संपादित: प्राची मर्जरेकर

Comments are closed.