Maharashtra politics eknath shinde rajan salvi uday samant kiran samant
विधानसभा निवडणूक 2024 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत आमदार राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत. मात्र, राजन साळवींच्या या पक्षप्रवेशाला कोकणातील शिवसेनेचे आमदार असलेल्या सामंत बंधूनी जोरदार विरोध केला.
Rajan Salvi On Uddhav Thackeray मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पराभूत आमदार राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत. मात्र, राजन साळवींच्या या पक्षप्रवेशाला कोकणातील शिवसेनेचे आमदार असलेल्या सामंत बंधूनी जोरदार विरोध केला. परंतु, तरीही एकनाथ शिंदे आज (13 फेब्रुवारी) राजन साळवींना पक्षात प्रवेश देत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे आज दुपारी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश आहे. (maharashtra politics eknath shinde rajan salvi uday samant kiran samant)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजन साळवी यांना पक्षात प्रवेश देत असल्याने कोकणातील सामंत बंधूच्या वर्चस्वालाच धक्का दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाआधीच त्यांच्यात आणि सामंत बंधूंमध्ये समेट घडवून आणला आहे. बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी राजन साळवी आणि उदय सामंत, किरण सामंत यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यातील अंतर्गत वाट मिटवून या दोघांमध्ये समेट घडवून आणली. ही बैठक तब्बल 2 तास सुरू होती. या बैठकीनंतर किरण सामंत आणि राजन साळवी हे एकाच गाडीतून बाहेर पडले.
याशिवाय या बैठकीनंतर सामंत बंधुंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “राजन साळवी हे राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांच्यासोबत आमची बैठक होती. या बैठकीला किरण सामंत आणि मी उपस्थित होतो. राजन साळवी यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे उदय सामंत म्हणाले. तसेच, “राजन साळवी यांना शिवसेनेत योग्य तो मानसन्मान मिळेल”, असे किरण सामंत यांनी म्हटले.
हेही वाचा – मराठी : मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदेंची पुन्हा दांडी, कारण काय?
Comments are closed.