अंकिता लोखंडेविरोधात मानहानीचा खटला दाखल, रोझलिन खानला ‘चीप’ बोलणं पडलं भारी
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अभिनेत्री हिना खानवर निशाणा साधत चर्चेत असलेल्या रोझलिन खानने आता प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.रोझलीनने एका मुलाखतीत हिना खान ही कॅन्सरबाबत पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले होते. अशावेळी अंकिताने तिची मुलाखत इंस्टाग्रामवर शेअर करत तिला चांगलेच सुनावले होते. शिवाय तिला ‘चीप’ म्हटले होते. आता रोझलिनने अंकितावर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
रोझलिनने इंस्टाग्रामवर कागदपत्रे शेअर केली आणि खटला दाखल करण्यामागील कारण स्पष्ट केले. रोझलिनने लिहिले, मी हिना खानच्या 15 तासांच्या शस्त्रक्रियेबद्दल आणि तिच्या उपचारादरम्यान तिला आलेल्या अडचणींबद्दल प्रश्न विचारला. हिनाने माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, शिवाय रुग्णालयानेही गप्प राहणे पसंत केले. मात्र काही अज्ञात लोकं मला धमकावत आहेत. माझ्या पेजवर वाईट टिप्पण्या पोस्ट केल्या जात आहेत. हिनाचे फॅन पेज माझे व्हिडिओ शेअर करून मला ट्रोल करत आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशनला कळवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता असे म्हटले आहे.
रोझलिन पुढे लिहिते, वास्तव न तपासता अंकिता लोखंडेने माझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा तमाशा होऊनही हिना सांगू शकली नाही की, ती 15 तासांची अशी कोणती शस्त्रक्रिया करत आहे? केमोथेरपी आणि सुपर मेजर सर्जरीनंतर ती स्कूबा डायव्हिंग, स्नो स्लाइडिंग आणि इतर स्टंट कसे करू शकते?” असे सवालही केले आहेत.
अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहीले होते की, “कोणी इतके खालच्या पातळीवर कसे जाऊ शकते? अरे देवा! हे खूप चीप आहे! तुमच्या माहितीसाठी मॅडम, हिना खान कर्करोगाशी खूप धैर्याने लढत आहे. मी हे खूप आत्मविश्वासाने सांगू शकते कारण ते मला माहित आहे. काही दिवसांपूर्वी विकी हिनाला रुग्णालयात भेटला. हिना तिथे रॉकीसोबत होती आणि तिची केमोथेरपी घेत होती. विकीने मला सांगितले की, हिनाची अवस्था पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. हिना, तू खूप धाडसी आहेस, आमचा शेरखान! देव तुला आशीर्वाद देवो.
Comments are closed.