Maharashtra Weather Where it is hot in state, where it is cool; temperature in Mumbai also decreased


राज्याच्या तापमानात वाढ होणार असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे काही भागांमधील तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे मात्र काही भागातील तापमानाचा पारा खाली घसरलेला आहे.

मुंबई : राज्याच्या तापमानात वाढ होणार असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. त्याप्रमाणे काही भागांमधील तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. पण दुसरीकडे मात्र काही भागातील तापमानाचा पारा खाली घसरलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहराचा समावेश आहे. मुंबईत दिवसा जरी उन्हाचे चटके बसत असले तरी रात्री आणि सकाळी मात्र थंडी पडत आहे. पण राज्यात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे डोके चक्रावले आहे. कारण काही राज्यातील काही भागात कडक ऊन तर काही भागामध्ये जाणवणारा गारवा यामुळे येत्या काही दिवसांचे तापमानही असेच बदलते राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Maharashtra Weather Where it is hot in state, where it is cool; temperature in Mumbai also decreased)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या तापमानात मोठा बदल झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर आले असताना राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये कुलाबा येथे 22.6 तर सांताक्रूझ येथे 20.1अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे 2.6 आणि 2.4 अंशांनी अधिक होते. दिवसभरात वातावरणात कुलाबा येथे आर्द्रता अधिक होती तर सांताक्रूझ येथे मात्र 40 टक्क्यांहून कमी होती. कुलाबा येथे कमाल तापमानाचा पारा 31 अंश सेल्सिअस नोंदला गेला. कुलाबा येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा 1.1 अंश सेल्सिअस अधिक होते.

हेही वाचा… Mangaon News : माणगाव आरटीओची इमारत कशी बांधणार, परिवहन मंत्री काय म्हणाले

मुंबईतील तापमानात घट झालेली असली तरी शेजारील जिल्हा म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली आहे. ज्यामुळे पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यातील तापमानाचा पारा हा 34 डिग्री सेल्सियसवर पोहोचला आहे. पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यामध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे कुठे गारवा तर कुठे उष्णता असे सध्याचे महाराष्ट्रातील तापमान असल्याचे सांगण्यात येत आहे. वाऱ्यांची दिशा गेल्या दोन आठवड्यांपासून सतत बदलत आहे. वाऱ्यांचे अस्थिर वहन महाराष्ट्रावर टिकून असल्यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अटकाव होत आहे. वातावरणाला दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. जसे की, महाराष्ट्रावर हवेचा उच्च दाब तसेच प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेकडील थंड वारे अडवले जात आहेत.



Source link

Comments are closed.