ज्युदोत पुण्याच्या आदित्य परबला कांस्य

डेहराडून: महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आदित्य परब याने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मोनल संकुलात सुरू असलेल्या ज्युदो स्पर्धेतील १०० किलोवरील गटात कांस्यपदकाची कमाई केली.

उत्कंठापूर्ण लढतीत हरियाणाच्या साहिल कुमार याला वाझाआरी या डावाचा उपयोग करीत पराभूत केले. त्याचे कांस्यपदक निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या चाहत्यांनी अतिशय जल्लोष करीत त्याचे अभिनंदन केले. तो गोव्यामधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रात सुशील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माझे हे पहिलेच पदक असल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. यापुढे सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे, असे आदित्य याने सांगितले.‌ तो म्हणाला, माझ्याविरुद्ध कांस्यपटकाच्या लढतीत हरियाणाचा जरी खेळाडू असला, तरी मी कोणत्याही दडपण घेतले नव्हते. माझ्या क्षमते इतके 100% कौशल्य दाखवण्याचा माझा हेतू होता, आणि हे ध्येय साकार झाल्यामुळे मला खूपच समाधान वाटत आहे. माझ्या या यशाचे श्रेय आमच्या पथकातील सर्व प्रशिक्षक व सहकार्‍यांचे आहेत.

पदक विजेत्या परबचे अभिनंदन भारतीय ज्युदो महासंघाचे उपाध्यक्ष धनजंय भोसले, राज्य संघटनेचे तांत्रिक समितीचे सचिव दत्ता आफळे, व प्रशिक्षक सुशील गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. येथे महाराष्ट्राला या आधी श्रद्धा चोपडे हिने सुवर्णपदक जिंकले होते, तर आकांक्षा शिंदे हिला रौप्यपदक मिळाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स शुक्रवारपासून (दि.१४)
आरसीबीचा कर्णधार झाल्यानंतर रजत पाटीदारची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांची मने जिंकली!
आरसीबी संघाबद्दल कधीही न ऐकलेली मजेशीर आकडेवारी, पाहा एका क्लिकवर

Comments are closed.