दंगल चित्रपटचा महाराष्ट्राच्या स्वाती शिंदेकडून अ‍ॅक्शन रिप्ले…!स्वाती शिंदे, आदर्श पाटील अंतिम फेरीत

हरिव्दार: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कुस्तीत महाराष्ट्राची पदके निश्चित करून कोल्हापूरच्या स्वाती शिंदे, आदर्श पाटील अंतिम फेरीत मजल मारली आहे. कुस्तीला 25 सेकंद बाकी असताना दंगल चित्रपटाची आठवण करून देणारा 4 गुणांचा साईट थ्रो मारून स्वातीने हरियाणाच्या ज्योतीला नमवून कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात महाराष्ट्राच्या मल्लांचा डंका घुमला. कोल्हापूरच्या स्वाती शिंदेने 53 किलो वजन गटात, तर 74 किलो फ्रीस्टाईल गटात कोल्हापूरचा आदर्श पाटील यांनी प्रेक्षणीय कुस्त्या करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला.
महिलांच्या 53 किलो फ्रीस्टाईल प्रकारात स्वातीने सलामीच्या लढतीत आक्रमक खेळी करत राजस्थानच्या कविताला 10 -00 असे नमवले. उपांत्यपूर्व सामन्यात चंदिगडच्या संतोषीला स्वातीने संतोषीला भारंदाज डावावर चितपट करून चमकदार खेळ केला.

चुरशीच्या उपांत्य लढतीत तीन मिनिटाच्या पहिल्या फेरीत हरियाणाची ज्योती 1-0 गुणांनी आघाडीवर होती. दुसर्‍या फेरीत स्वातीने 2 गुण गुणांची कमाई करीत धोबीपछाड हा डाव मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटचे 25 सेकंद राहिले असताना स्वाती विरूध्द ज्योती लढतीचा गुणफलक 02- 03 असा होता. “करो या मरो” अशी स्थिती असताना स्वातीने ज्योतीवर साईट थ्रो या धोकादायक डावाचा वापर करत 4 गुणांची कमाई करून 07 -03 गुणांची सनासनाटी विजय संपादन केला. बुधवारी अंतिम फेरीत मध्य प्रदेशच्या पुजाविरूध्द स्वातीची सुवर्णपदकासाठी झुंज रंगणार आहे. मरुगुडमधील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल प्रशिक्षक दादा लवटे यांच्या मार्गदर्शन स्वातीला मिळत आहे.

74 किलो फ्रीस्टाईल गटात कोल्हापूरचा आदर्श पाटीलने उपांत्य फेरीत कर्नाटकचे रोहनला 10-0 गुणांनी एकतर्फी पराभूत केले. राजस्थान, झारखंडच्या मल्लांविरूध्द लढती जिंकून विजयाची हॅटट्रिक करून आदर्शने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आदर्श हा पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील काका पवार यांचा पठ्ठा आहे. आदर्श बुधवारी सेनादलाचा जयदिप विरूध्द सुवर्णापदकाची लढत होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

मिडलाईनने राजाभाऊ देसाई चषक जिंकला
टेबल टेनिस मध्ये महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोषची दोन पदके निश्चित
ॲथलेटिक्समध्ये संजीवनी जाधवला रौप्यपदक

Comments are closed.