ग्रुप A अन् ग्रुप B…; भारत, ऑस्ट्रेलियापासून दक्षिण अफ्रिका, इंग्लंडपर्यंत,पाहा Points Table
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 गुण सारणी: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची (Champions Trophy 2025) स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जात आहे. मात्र भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जात आहे. आज स्पर्धेतील मोठा सामना रंगणार आहे, तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान…भारताने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरी गाठायची असल्यास पाकिस्तानला आज भारताचा पराभव करावा लागेल. तर भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यास उपांत्य फेरीत भारत प्रवेश करेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु झाली असून 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत एकूण 8 संघ आहेत. यामध्ये ए आणि बी अशा गटात 4-4 संघाना विभागण्यात आले आहे. ए गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशचा समावेश आहे. बी गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान संघाचा समावेश आहे. तर सर्व 8 संघांनी एक-एक सामने खेळले आहे. स्पर्धेच्या शेवटी ए आणि बी गटाच्या गुणतालिकेतील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. म्हणजे एकूण चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. (Champions Trophy 2025 Points Table)
गट ए ची गुणक-
ए गटात न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने एक सामना जिंकला आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने देखील बांगलादेशचा पराभव करत पहिल्या सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंड आणि भारताचे प्रत्येकी 2-2 गुण आहेत. तर बांग्लादेश आणि पाकिस्तानचा अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. दोघांनीही आपला पहिला सामना गमावला आहे.
गट बी ची गुणक-
बी गटात दक्षिण अफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेने एक सामना जिंकला आहे. दक्षिण अफ्रिकेचे एकूण 2 गुण आहेत. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने देखील एक सामना जिंकला आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने स्पर्धेतील पहिला सामना गमावला आहे
आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना-
स्पर्धेतील हायव्होलटेज सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचा सामना आज (23 फ्रेब्रुवारी) रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा सामना दुपारी 2.30 वाजता खेळवण्यात येईल. भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला काहीही करुन विजय मिळवावा लागेल. जर पाकिस्तान संघाने हा सामना गमावला तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळजवळ अशक्य होईल.
पाकिस्तानचा संपूर्ण संघ (Pakistan Team) :बाबर अझम, कामरन गुलाम, सौद शकील, तायब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा (सब-कर्नाधर), मोहम्मद रिझवान (कर्नाधर), उसमान खान, अब्रार अहमद, हरीस राफ, मोहम्मद आफ्रिदी, इमाम-उल-हॅक
भारताचा संपुर्ना युनियन (टीम इंडिया): रोहित शर्मा (कर्नाधर), शुबमन गिल (सब-कर्नाधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ri षभ पंत, हार्दिक पांड्या, अष्टर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राविंदरा चक्रवर्ती, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अरशदीप सिंग
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.