टीम इंडियाच्या ‘बापू’चा नादच खुळा, असा थ्रो फेकला की इमाम उल हकचा खेळ खल्लास; पाकिस्तानी फॅन्सल

अ‍ॅक्सर पटेल डायरेक्ट हिट वि पाकिस्तान: भारत आणि पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दुबई क्रिकेट स्टेडियममध्येही आता तोच उत्साह दिसून येत आहे. या सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने असा रॉकेट थ्रो फेकला की थेट पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्लेइंग-11 मध्ये कोणाता बदल केला नाही, तर पाकिस्तानने दुखापतग्रस्त फखर जमानच्या जागी इमाम-उल-हकला संघात स्थान दिले, जो स्पर्धेतून बाहेर पडला होता.

भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने डावाच्या 10 व्या षटकात एक शानदार डायरेक्ट थ्रो केला आणि इमाम-उल-हकला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. पाकिस्तानी सलामीवीराला तो बाद झाला यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. दहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवने चेंडू टाकला, जो इमामने मिड-ऑनकडे मारला आणि एक धाव चोरण्यासाठी पळाला. पण 30 यार्डच्या वर्तुळात उभे असलेल्या अक्षरने क्षणाचाही विलंब न करता चेंडू उचलला आणि एका क्षणात स्टंप उडावला. यासह, इमामचा डाव फक्त 10  धावांवर संपला.

पाकिस्तानी फॅन्सला रडू कोसळलं!

इमाम उल हक आऊट झाल्यानंतर काही पाकिस्तानी महिला चाहत्याचा फोटो व्हायरल होत आहे. एका सुंदर महिला चाहत्याने पांढरा ड्रेस घातला आहे. पण मिड-ऑनवर उभ्या असलेल्या अक्षर पटेलने अचूक थ्रो केल्यानंतर या महिला चाहत्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. त्याचे डोळे पाणावले आणि त्याने कपाळाला हात लावला.

इमाम उल हकबद्दल बोलायचे झाले तर, तो डिसेंबर 2023 नंतर पाकिस्तानी संघात परतत होता. त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघात स्थान मिळाले नाही. याआधी त्याने ऑक्टोबर 2023 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. फखर झमानच्या जागी 15 महिन्यांनी संघात परतल्यानंतर त्याला पूर्ण फायदा घेता आला नाही. भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने 26 चेंडूत फक्त 10 धावा केल्या.

हे ही वाचा –

Mohammed Shami Injury : देखो वो आ गया! टीम इंडियाचा ढाण्या वाघ मैदानात परतला; Live सामन्यात झाली होती दुखापत

अधिक पाहा..

Comments are closed.