फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला मतदान केलंय – सुरेश धस

महायुतीत सध्या वर्चस्वावरून धुसफूस सुरू आहे. आधीच महायुतीतीतल वातावरण तापलेले असताना भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ”राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) चेहऱ्याकडे बघून मिंधे व अजित पवार गटाला मतदान केल्याचे ते म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत वादाची आणखी एक ठिणगी पडली आहे.
”देवेंद्र फडणवीस एक इमानदार चेहरा आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे या भावनेतून जनतेने आमच्यासोबत घड्याळलाही (अजित पवार गट) आणि बाणालाही (मिंधे गट) मतदान केलं. आमची लोकं घड्याळाला मतदान करू शकतात का? तरिही दिलं. घड्याळही हाणलं आणि बाणही हाणला, असं सुरेश धस म्हणाले. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Comments are closed.