सूट्टा मारेट है, वेट लेटे हा, बिब्बी विभाग! राजवाड्यातही अम्लीय हब भयानक आहे; पोलिसांचे कोनोइस

सुट्टा मारते है, व्हाईट लेते है, बिबी खाते है, माल मारते.. असे डायलॉग सर्रासपणे पालघरमध्ये नाक्यानाक्यावर ऐकायला मिळत आहेत. धक्कादायक म्हणजे यात महाविद्यालयीन तरुणाईचा भरणा अधिक आहे. मात्र अमली पदार्थांचा संपूर्ण जिल्ह्याला विळखा पडत असताना पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने अमली पदार्थ विकणाऱ्यांची साखळी अधिकच मजबूत होत चालली आहे.

पालघरमध्ये अमली पदार्थांचा सुळसुळाट असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना समजली होती. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पालघरमध्ये ड्रग्जला नो एण्ट्री करा अशा सूचना 20 फेब्रुवारीच्या जनता दरबारात केल्या आहेत त्यामुळे पालघरमध्ये अमली पदार्थ विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पालघर, बोईसर, जव्हार, मोखाडा, डहाणू अशा शहरी भागांच्या ठिकाणी गुटखा, भांग, गांजा अशा पदार्थांची सर्रास विक्री होताना दिसून येते. आता तर बाजारात नव्याने केमिकल पट्टी आली आहे. यामध्ये काही तंबाखू, अमली मिश्रण व गांजा टाकून स्वस्त नशा विद्यार्थीवर्ग करताना दिसून येत आहेत. साध्या पानटपऱ्यांवरून हे सर्व पदार्थ सहजरीत्या विकत मिळत आहेत. त्यामुळे पोलिसांचा या प्रकारावर अंकुश राहिलेला नसल्याचे दिसून येते.

पोलीस अधीक्षकांचे एका ओळीत उत्तर

पालघर, बोईसर, मनोर, डहाणू अशा भागांमध्ये उघडपणे नशेचा बाजार सुरू आहे. यामागे मोठे रॅकेट असून पोलिसांनी पुढाकार घेतल्यास रॅकेट उद्ध्वस्त होऊ शकते असे काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या कारवाया सुरू आहे असे एका ओळीत उत्तर दिले.

पोलिसांचाही सहभाग असल्याचा आरोप

अलीकडेच बोईसर काटकर पाडा येथे पोलिसांनी मेफेड्रीन बनवणाऱ्या एका तरुणाला अटक केली होती. त्याच्याकडे तब्बल अडीच कोटी रुपयांचे अमली पदार्थ असलेले मेफेड्रीन नामक ड्रग्स जप्त करण्यात आले. या तरुणांकडून स्थानिक पातळीवर हे अमली पदार्थ विकले जाण्याची शक्यता आहे. यामागे मोठी साखळी कार्यरत असून यामध्ये पोलीस प्रशासनही सामील असल्याचे आरोप होत आहेत.

Comments are closed.