'AI ने संघ निवडला का?' पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी खेळाडूंचा संताप, शोएब अख्तर-वसीम अक्रम यांनी फोडले तोंड!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठीचा पाकिस्तानचा आत्ता पर्यंतचा प्रवास अतिशय लाजिरवाणा आहे. आपल्याच घरच्या मैदानावरती पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात न्युझीलंड विरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. दुसरा सामना भारताविरुद्ध झाला व त्यातही पाकिस्तानच्या हाती काहीच लागले नाही. हे दोन्ही पराभव लाजिरवाणे आहेत कारण पाकिस्तानने कधीही वर्चस्व गाजवले नाही. फलंदाजी असो वा गोलंदाजी, पाकिस्तानी संघ प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरला आहे. आता संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. या प्रकरणात, पाकिस्तान संघाचे माजी खेळाडूंचे संतापने साहजिकच आहे. शोएब अख्तरने त्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की त्यांच्याकडे मेंदू नाही. वसीम अक्रम, इंझमाम-उल-हक सारख्या दिग्गजांनीही पीसीबी व्यवस्थापनावर हल्लाबोल केला.

भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर शोएब अख्तरने अनेक व्हिडिओ शेअर केले. एका व्हिडिओमध्ये त्याने पीसीबी व्यवस्थापनावर आपला राग व्यक्त केला. ते म्हणाले, “मी अजिबात निराश नाहीये, कारण मला काय करावे हे कळत नाहीये. जग 6 गोलंदाजांसह खेळत आहे आणि आपण 5 गोलंदाजांसह. हे बुद्धिमान व्यवस्थापन नाहीये. मी खूप निराश आहे. आता, आपण खेळाडूंना काय म्हणावे, त्यांना काहीही माहिती नाही. खेळाडू व्यवस्थापनासारखेच असतील. हे निराशाजनक आहे. पाकिस्तानी खेळाडूंकडे विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल सारखे स्किल सेट नाहीये.”

वसीम अक्रम म्हणाले, “पाकिस्तान व्यवस्थापनाने आता काही धाडसी निर्णय घ्यावेत, हीच योग्य वेळ आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात आपल्याला खेळाडूंना आणावे लागेल, त्यासाठी तुम्हाला संघातून 5-6 खेळाडू बदलावे लागले तरी चालेल. आता संघाला 2026 च्या वर्ल्ड कपबध्दल विचार करावा लागेल आणि पुढचे नियोजन करावे लागेल. जरी आपण हरलो तरी पुढील 6 महिने खेळाडूंना पाठिंबा द्यावा.”

वसीम अक्रमने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आणि लाईव्ह शोमध्ये म्हटले, “एक माणूस ज्योतिषाकडे जातो व आपला हात दाखवतो. ज्योतिषी म्हणतो, तू गरीब होशील, नंतर अजून गरीब होशील, मग तुला याचीच सवय होऊन जाईल. अशी अवस्था आहे.”

मोहम्मद हाफिजने एका टीव्ही कार्यक्रमात सांगितले की, “ही निवड करण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला आहे. त्यांच्याकडे डेटा आहे, त्यांना संघ कसे बनवायचे हे माहित आहे. ते एआयच्या मदतीने खेळाडू निवडतात. निवडलेला संघ माझ्या समजण्यापलीकडे आहे. संघ निवडण्यासाठी मेंदू जिथे पोहोचू शकतो, तिथे माझे मन त्या पातळीवर पोहोचू शकत नाही.

महत्वाच्या बातम्या :

पाकिस्तानच्या आशा जिवंत, आता बांगलादेश ठरवणार नशिब!

IND vs PAK: भारतासह पाकिस्तानमध्येही किंग कोहलीच्या नावाचा जयघोष, पाहा व्हिडिओ!

रोहितने या खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय, कोहलीबद्दलही दिली भावनिक प्रतिक्रिया!

Comments are closed.