“भारताच्या विजयावर शोएब मलिकने केली पाकिस्तानची चेष्ठा
रविवारी 23 फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 6 विकेट्सनी पराभूत केले. पूर्ण सामन्यात एकाही क्षणाला असे वाटले नाही की, हा सामना पाकिस्तान संघ जिंकेल. 241 धावांवर पाकिस्तानची पूर्ण टीम ऑल आऊट झाली. त्यानंतर ही पाकिस्तान संघ चांगली गोलंदाजी करू शकला नाही. विराट कोहलीने त्याच्या करिअरमधील 82 व आंतरराष्ट्रीय शतक आणि 51व वनडे शतक पूर्ण केलं.
पाकिस्तानच्या पराभवावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकने गाणं गाऊन संघाची चेष्टा केली आहे. त्यानंतर त्याच्यासोबत बसलेली महिला प्रेझेंटर म्हणाली की आता या गोष्टींची सवय झाली आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब अख्तरने टीव्ही स्टुडिओ मधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये शोएब मलिक बसलेला आहे . शोएब अख्तरने शोएब मलिकला पाकिस्तानच्या पराभवानंतर विचारले तेव्हा शोएब मलिकने गाणं गाऊन आपल्या संघाची चेष्टा उडवली. त्यावेळी त्याने बॉलीवूडमधील ‘दिल के अरमा आंसुओ मे बह गए’ हे गाणं गायलं.
शोएब अख्तर ने पुन्हा त्या स्टुडिओमध्ये बसलेल्या महिला प्रेझेंटर जैनबला विचारले असता तिनेही गायला सुरुवात केली , ती म्हणाली ‘अब तो आदात सी है मुझको, ऐसे जीने में’.
पाकिस्तान वर भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवान म्हणाला की, आम्ही नाणेफेक जिंकलो पण त्याचा फायदा घेता आम्हाला आला नाही. तसेच तो म्हणाला की भारतीय संघाने शानदार गोलंदाजी केली आणि फलंदाजी करताना विराट कोहली आणि शुबमन गिलने त्यांना सामन्यापासून दूर केले.
नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सऊद शकीलने (62) आणि मोहम्मद रिजवान (46) धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तान 241 धावांची सन्मानात्मक धावसंख्येच आव्हान भारतासमोर उभ करू शकला. भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना 45 चेंडू शिल्लक असताना 242 धावांचं लक्ष पार केलं. भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हा दुसरा विजय आहे. तसेच पाकिस्तान संघ त्यांचे दोन्ही सामने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. भारतीय संघासाठी विराट कोहलीने शानदार अशी शतकी पारी खेळली. त्याने शेवटच्या चेंडूवर विजयाचा चौकार मारून त्याच शतक पूर्ण केलं.
हेही वाचा
पाकिस्तानच्या आशा जिवंत, आता बांगलादेश ठरवणार नशिब!
IND vs PAK: भारतासह पाकिस्तानमध्येही किंग कोहलीच्या नावाचा जयघोष, पाहा व्हिडिओ!
Comments are closed.