“भारतीय युवा स्टारला पाकिस्तानी दिग्गजाने दिली दाद, काय म्हणाले वसीम अकरम?”

चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यांकडे संपूर्ण विश्वाचे लक्ष लागलं होतं. दुबईमध्ये महासामना बघण्यासाठी मोठमोठ्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडू कलाकार उपस्थित होते. यामध्ये भारतीय संघाचा एक युवा खेळाडू जो सामना खेळण्यासाठी उपस्थित नव्हता. पण तरी तो चर्चेमध्ये आला. या खेळाडूचे नाव अभिषेक शर्मा आहे. त्याचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे. ज्यामध्ये वसीम अकरम त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अकरम क्रिकेट मधल्या सन्मानित खेळाडूंपैकी एक आहेत. जर त्यांनी एखाद्या खेळाडूचे कौतुक केले असेल तर नक्कीच त्या खेळाडूमध्ये काहीतरी विशेष चांगली गोष्ट असेल. अभिषेकने मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी वानखेडेच्या स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेत 135 धावांची ऐतिहासिक पारी खेळली होती. त्यावेळी अभिषेकने फक्त 35 चेंडूत त्याच शतक पूर्ण केलं होतं.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वसीम अकरम म्हणाले की, ती जबरदस्त पारी होती, मी सुद्धा तो सामना पाहिला. पुढे तू अजून चांगलं खेळ. आता तर सुरुवात आहे. अजून तीस वर्षांपर्यंत पुढे खेळत जायचं आहे. चांगल्या डोक्याने खेळावर फोकस कर आणि पुढे जाऊन चांगले खेळ. तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा.

शोएब अख्तर क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात घातक गोलंदाजांपैकी एक आहे. अख्तरचा सगळ्यात वेगाने चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड आत्तापर्यंत कोणीही तोडू शकलं नाही. त्यांनी अभिषेक शर्माचे कौतुक करताना ते म्हणाले की, मला आनंद आहे की माझा जन्म या युगात झाला नाही. या युवा खेळाडूला सगळेजण यासाठी पसंत करतात कारण त्याने शतक लावले आहे. मी सुद्धा त्याची पारी बघितली जी की एकदम शानदार होती.

हेही वाचा

जियो हॉटस्टार वरती ऐतिहासिक क्षण! भारत-पाकिस्तान सामन्याने गाठला 60 कोटी प्रेक्षकांचा नवा उच्चांक

“भारताच्या विजयावर शोएब मलिकने केली पाकिस्तानची चेष्ठा

भारत-पाक क्रिकेट भविष्यवाणी फसली! – IIT बाबांच्या वक्तव्यावर टीकेचा भडिमार.

Comments are closed.