सांगा देशाचा गद्दार कोण? मोहम्मद शमी आणि जावेद अख्तर यांना ट्रोल करणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी सुनावले

क्रिकेटर मोहम्मद शमी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या धर्मामुळे देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. पण दोघेही देशभक्त आहेत आणि देशाची मान उंचावण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्रोलर्सला सुनावले. तसेच भाजप नेते अनुराग ठाकूर आणि पाकिस्तान क्रिकेटपटू शाहित आफ्रिदी यांचा फोटो शेअर करत देशाचे गद्दार कोण आहे असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, हे अंधभक्त देशाला कुठे घेऊन चालले आहेत? क्रिकेटर मोहम्मद शमी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या धर्मामुळे देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. दोघेही देशभक्त आहेत आणि देशाची मान उंचावण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे.

पण हेच ट्रोलर्स भाजप नेते आणि माजी मंत्र्यांना प्रश्न विचारत नाही जे एका पाकिस्तानी क्रिकेटरसोबत बसतात, ज्या पाकिस्तानी खेळाडूने हिंदुस्थाविरोधात आपली मतं व्यक्त केली आहेत. हे माजी मंत्री प्रत्येक विरोधकांना पाकिस्तानला जाण्याचा सल्ला देतात आणि भर रस्त्यात देश के गद्दारोको सारख्या घोषणा देतात. आज देशाचे गद्दार कोण आहेत?

या नेत्याच्या जागी दुसऱ्या पक्षाचा नेता असता तर? आंदोलन, गुन्हे, हिंदुस्थानी विरोधी म्हणत त्यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला असता. आणि माध्यमांवर चर्चा झडल्या असत्या. दुर्देवं देशातच फूट पाडायची, एकमेकांविरोधात भांडायला लावायचं. हिंदु आणि मुस्लिमांमध्ये भेद निर्माण करायचे ही भाजपचे तत्वज्ञान आहे आणि याच बळावर निवडणुका जिंकायच्या. पण त्यांचे बॉस आणि त्यांच्या बॉसचे कुटुंबीयांना याचे काही घेणेदेणे नाही, जे लोक पाकिस्तानी आहेत आणि उघडपणे हिंदुस्थानविरोधी कारवाया करतात त्यांच्यासोबत हे लोक पार्टी करू शकतात.

हेच भाजपवाले जे बीसीसीआय चालवतात ते बांगलादेशींसोबत क्रिकेट खेळले. जेव्हा भाजपची संपूरण सोशल मिडीया इकोसिस्टम आणि मीडिया आपल्याला सांगत होते की बांगलादेशात हिंदुंवर अत्याचार होत आहे.
निवडणुका झाल्या, हिंदुंना विसरा आणि देशभक्ती विसरा असे सध्या भाजपचे धोरण आहे. किंवा देशभक्तीपासून सध्या भाजपने ब्रेक घेतला असावा.

जेव्हा तुम्हाला हे लोक देशभक्ती आणि हिंदुत्व शिकवतील तेव्हा त्यांना हा फोटा दाखवला ज्यात भाजपचा मंत्री एका हिंदुस्थानी क्रिकेटर्सविरोधातल्या पाकिस्तानी खेळाडूसोबत बसला आहे. हे त्यांना चालतं का? असा सवाल करत माझी देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे तुम्ही माझ्या देशभक्तीचा आदर करा मी तुमच्या देशभक्तीचा आदर करेन. पण द्वेषाबाबत कुठलाही तडजोड नाही असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

Comments are closed.