गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार

गौतम अदानी गुंतवणूक योजना: जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक असलेले भारतीय उपियोगपती गौतम अदानी (गौतम अदानी) यांनी नवीन प्लॅन तयार केला आहे. यामध्ये ते 2 लाख कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक (Investment ) करणार आहेत. अदानी समूह मध्य प्रदेशातील विविध क्षेत्रांमध्ये 2.10 लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. मध्य प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2025 च्या व्यासपीठावरून त्यांनी ही घोषणा केली आहे.

अदानी समूह ‘या’ क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणार

मध्य प्रदेशत राज्यात अदानी समूहाच्या या मोठ्या गुंतवणुकीतून 1 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.  मध्य प्रदेशातील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2025 च्या व्यासपीठावरून अदानी समूहाने राज्यात 2.10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये केली जाईल, ज्यामध्ये पंप केलेले स्टोरेज, सिमेंट, खाणकाम, स्मार्ट मीटर आणि थर्मल एनर्जी क्षेत्रांचा समावेश आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, 1 लाख कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीअंतर्गत ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी प्रकल्प आणि विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य सरकारशी बोलणी सुरू आहेत.

2030 पर्यंत 1.20 लाख नोकऱ्या मिळणार

गौतम अदानी यांनी शिखर परिषदेत गुंतवणुकीची घोषणा करताना सांगितले की, या माध्यमातून मध्य प्रदेशात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. 2030 पर्यंत 1.20 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची समूहाला आशा आहे. ही केवळ गुंतवणूक नसून एका प्रवासाची सुरुवात आहे, ज्याद्वारे औद्योगिक आणि आर्थिक वाढीच्या बाबतीत मध्य प्रदेश आघाडीवर असेल.

अदानी समूहाने मध्य प्रदेशात आधीच मोठी गुंतवणूक केली

अदानी समूहाने मध्य प्रदेशात आधीच मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही गुंतवणूक ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांसह उत्पादन, लॉजिस्टिक आणि कृषी क्षेत्रात करण्यात आली आहे. याद्वारे 25,000 हून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. नवीन गुंतवणुकीतून राज्यातील औद्योगिक परिसंस्था आणखी मजबूत होईल असे गौतम अदानी म्हणाले. अदानी उद्योग समूह तब्बल 2 लाख कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक करणार असल्यानं मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याचा मोठा फायदा राज्यातील बेरोजहार तरुणांना होणार आहे. या माध्यमातून विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान या गुंतवणुकीतून 1 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अदानींसाठी 2025 निराशाजनक! 2 महिन्यात 1.04 लाख कोटींचा फटका, अदानींची एकूण संपत्ती किती?

अधिक पाहा..

Comments are closed.