भयंकर! ट्रकचा टायर फुटला अन् रिक्षाच्या चिंधड्या झाल्या, व्हिडीओ व्हायरल

रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये देशात बरीच वाढ झाली आहे. अशा काही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. असाच एक मुंबईतला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धावत्या ट्रकचा टायर फुटल्याने रिक्षाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या आहेत. तसेच रिक्षा चालकाला सुद्धा गंभीर इजा झाली असून त्याच्या कानाचा फडदा फाटल्याचे सांगितले जात आहे.

सदर व्हिडीओ नवी मुंबईतील वाशीमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक नजीक असलेल्या रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. रिक्षाचा फक्त सापळा शिल्लक राहिला आहे. टायर फुटल्याच्या आवाजाने रिक्षा चालकाच्या कानांना गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे तो दोन्ही कानांवर हात ठेवून ओरडत असल्याचे दिसत आहे. तसेच ‘मला काही एकायला येत नाही’ असे सुद्धा तो म्हणताना दिसत आहे. या घटनेमुळे रिक्षा चालकाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच त्याच्या कानाच्या पडद्याला इजा झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments are closed.