दुबईत भारतीय संघाला धक्का, पाकिस्तानचा मोठा विजय ,बाबर-रिझवान चमकले

दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तानचा पहिला सामना 2021 च्या टी20 विश्वचषकात झाला होता. पण आता भारताने आता परिस्थिती उलटली आहे. खरं तर, 2021 च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानने दुबईच्या मैदानावर भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. आता भारताने दुबईमध्ये पाकिस्तानला हरवून 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बरोबरी साधली आहे.

रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन संघात 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना खेळण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम खेळल्यानंतर 241 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या सामन्याविजेत्या शतकाच्या जोरावर भारताने 42.3 षटकांत लक्ष्य पूर्ण केले. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा पराभव पाकिस्तानसाठी खूपच धक्कादायक आहे, कारण आता त्यांचे 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणे जवळजवळ निश्चित झाले आहे.

2021 च्या टी20 विश्वचषकातील लीग स्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघ प्रथम खेळल्यानंतर 20 षटकांत सात विकेट्सच्या मोबदल्यात 151 धावा करू शकला. भारताकडून तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्याच वेळी रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. याशिवाय केएल राहुल 08 आणि सूर्यकुमार यादव 11 हेही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर पाकिस्तानने 17.5 षटकांत एकही विकेट न गमावता सामना जिंकला. पाकिस्तानकडून बाबर आझमने नाबाद 68 आणि मोहम्मद रिझवानने नाबाद 79 धावा केल्या. गेल्या तीन वर्षांपासून भारताच्या पराभवाची सतत चर्चा होत होती. मात्र, आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने स्वतःच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या जखमांवर मलम लावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

पाकिस्तानच्या आशा भंगल्या! बांग्लादेशची सुमार कामगिरी, फक्त 236 धावा

“भारताविरुद्ध जिंकण्यासाठी मोहम्मद रिझवानचा टोटक्याचा प्रयत्न? माळ घेऊन प्रार्थना करूनही पराभव!”

विराट कोहली झिंदाबाद! भारताच्या विजयानंतर जावेद अख्तर का झाले ट्रोल?

Comments are closed.