पाकिस्तानच्या आशा भंगल्या! बांग्लादेशची सुमार कामगिरी, फक्त 236 धावा
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आजचा सामना बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघात खेळला जात आहे. या सामन्यावरून पाकिस्तान संघाचे भविष्य ठरणार आहे. तसेच बांगलादेश संघ पाकिस्तानच्या आशांवर खरा ठरू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 50 षटकारात फक्त 236 धावा केल्या आहेत. बांगलादेश संघासाठी कर्णधार नजमुल हुसेनने (77) सगळ्यात जास्त धावा केल्या. तसेच जाकीर अलीने 45 धावा केल्या.
जर आज न्यूझीलंड संघ जिंकला तर पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या बाहेर जातील. याच कारणामुळे आज पाकिस्तान बांगलादेश संघ विजयी होण्यासाठी प्रार्थना करत असतील. न्यूझीलंडच्या संघासमोर बांगलादेशचे फलंदाज काही चांगली कामगिरी करू शकले नाहीत पण आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की, न्यूझीलंडचे फलंदाज कशी कामगिरी करतात?
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचे सलामीवीर लयीत खेळताना दिसून आले. 8 व्या षटकारातल्या दुसऱ्या चेंडूवर 45 धावांवर बांगलादेशचा पहिला खेळाडू बाद झाला. तंजीद हसन 24 चेंडूंवर एक चौकार आणि दोन षटकार मारून 24 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर पाठोपाठ विकेट्स पडत गेल्या.
तिसऱ्या क्रमांकावर आलेला मेहदी हसन मेराजने 13, तर तौहिद ह्दोय 07 धावा , मुशफिकुर रहीम 2 धावा, आणि महमूद्दुलाह 04 धावांवर बाद झाले. मात्र कर्णधार संघासाठी खेळत राहिला. त्याने 110 चेंडूत 9 चौकारांसह 77 धावांची पारी खेळली. यष्टीरक्षक जाकीर अलीनेही त्याला चांगली मदत केली. जाकिरने 55 चेंडूत 45 धावा केल्या. त्यामध्ये त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला. फिरकी गोलंदाज रिशाद हुसेनने वेगाने धावा करण्याचा प्रयत्न केला. त्याने 25 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 26 धावा केल्या, शेवटी तस्किन अहमद ने 10 धावा केल्या.
न्यूझीलंड संघासाठी फिरकी गोलंदाज मायकल ब्रेसवेलने कमालीची गोलंदाजी केली. त्याने 10 षटकारात 26 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. याशिवाय विलियम ओरुकनेही चांगली गोलंदाजी केली.
हेही वाचा
“भारताविरुद्ध जिंकण्यासाठी मोहम्मद रिझवानचा टोटक्याचा प्रयत्न? माळ घेऊन प्रार्थना करूनही पराभव!”
विराट कोहली झिंदाबाद! भारताच्या विजयानंतर जावेद अख्तर का झाले ट्रोल?
22 पंडित आणि जादूटोण्याने पाकिस्तानचा पराभव? भारतावर आरोप करत, पाक मीडियाच्या हास्यास्पद दावा
Comments are closed.