किंग नक्की कोण, बाबर की कोहली? वहाब रियाजने काय दिले उत्तर!
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. भारत उपांत्य फेरीचे स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे पाकिस्तान स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वहाब रियाजला काही प्रश्न विचारले. विराट कोहली भारतात आणि बाबर आझम पाकिस्तान मधील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक मानले जातात. वहाब रियाजला क्रिकेट मधील किंग कोण इथपासून ते सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू कोण आहे याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले.
आकाश चोप्राने पहिला प्रश्न विचारला की रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवानमध्ये चांगला कर्णधार कोण आहे? वहाब रियाजने रिझवानचे नाव घेतल्यावर आकाशला धक्का बसला. त्यानंतर आकाश म्हणाला, “आमचा किंग की तुमचा किंग.” उत्तरात रियाजने पुन्हा एकदा धक्कादायक प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला,” विराट कोहली भारताचा किंग आहे, तर बाबर पाकिस्तानचा किंग आहे.”
हार्दिक पांड्या सध्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याविरुद्ध पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू फहीम अश्रफ आहे. जेव्हा दोघांची तुलना केली गेली तेव्हा रियाझने पाकिस्तानी खेळाडू फहीमला चांगला खेळाडू असे म्हटले. आकाश चोप्रा आश्चर्यचकित झाला आणि शेवटी म्हणाला की वहाब रियाझ पक्षपाती आहे.
हार्दिक पांड्या सध्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याविरुद्ध पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू फहीम अश्रफ आहे. जेव्हा दोघांची तुलना केली गेली तेव्हा रियाझने पाकिस्तानी खेळाडू फहीमला चांगला खेळाडू म्हटले. आकाश चोप्रा आश्चर्यचकित झाला आणि शेवटी म्हणाला की वहाब रियाझ पक्षपाती आहे.
शुबमन गिल आणि इमाम उल हकची तुलना केली असता, रियाझ म्हणाला की, एकदिवसीय शतकांच्या बाबतीत ते समान आहेत, जरी गिलने आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये इमामपेक्षा एक शतक कमी केले आहे. कुलदीप यादवकडे दुर्लक्ष करून, रियाझने अबरार अहमदला पसंती दिली.
महत्वाच्या बातम्या :
भारत-पाक सामन्यात शानदार क्षेत्ररक्षण! शिखर धवनने केला या खेळाडूचा गौरव
दुबईत भारतीय संघाला धक्का, पाकिस्तानचा मोठा विजय ,बाबर-रिझवान चमकले
पाकिस्तानच्या आशा भंगल्या! बांग्लादेशची सुमार कामगिरी, फक्त 236 धावा
Comments are closed.