Sushma Andhare Criticizes Neelam Gorhe Regarding Mercedes Allegation


(Andhare Vs Gorhe) मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर साधारणपणे वर्षभराने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. एखादे पद मिळविण्यासाठी दोन मर्सिडिज गाड्या द्याव्या लागत होत्या, असा दावा त्यांनी केला. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत नीलम गोऱ्हे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. (Sushma Andhare Criticizes Neelam Gorhe Regarding Mercedes Allegation)

राजधानी दिल्लीमध्ये 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये “असे घडलो आम्ही” या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर हा आरोप केला आहे. याच अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी साहित्यिकांच्या व्यासपीठावर नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नीलम गोऱ्हे म्हटल्यानंतर काय आठवते? एखादी कादंबरी, त्यांनी लिहिलेला वैचारिक ग्रंथ, ललित लेखन, कवितासंग्रह, गेला बाजार एखादा चारोळी संग्रह… त्यांची कोणती साहित्यकृती जास्त गाजली? हे सगळे विचारण्याचे कारण साहित्य संमेलनामध्ये नीलम गोऱ्हे यांची एक मुलाखत झाली! राजकारण्यांना बोलावले ही साहित्यिकांची अपरिहार्यता आणि अगतिकताही झाली आहे. शिवाय राजकारणी लोकांनाही स्वतःला बुद्धिजीवी म्हणून प्रमाणित करून घेण्याची ही नामी संधी असते. त्यामुळे शासकीय खर्चाने होणाऱ्या साहित्य संमेलनातून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची संधी सोडतील त्या नीलम गोऱ्हे कसल्या! असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : अटकेच्या भीतीनेच एकनाथ शिंदे कर्नाटकात गेले नाहीत, राऊतांचा दावा

नीलम गोऱ्हे यांनी साहित्याचे जतन-संवर्धन यावर काही बोलावे, हे अपेक्षितच नाही कारण आडात असेल तर पोहऱ्यात येईल ना? मग त्यांनी म्हटले, “मी पक्षात असताना खूप आर्थिक व्यवहार चालायचे” मला मोठी गंमत वाटली. नीलम गोऱ्हे पंचवीस-तीस वर्षे शिवसेनेत होत्या. अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली. 18 महिने 13 त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडीक असायच्या. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या पक्षात असताना आर्थिक व्यवहार चालायचे तर, स्वाभाविक आहे की, नियुक्त्या-नेमणुका, निवडणुकीची तिकिटे या सगळ्या प्रक्रियेत नीलम गोऱ्हे होत्या; म्हणजे हा सगळा पैसा नीलम गोऱ्हे यांच्याकडे येत असणार? काय केले असेल त्यांनी एवढ्या पैशांचे? परदेशात एखादा बँक खाते असेलच की, असा टोला त्यांनी लगावला आहे.

नीलम गोऱ्हे हे नाव उच्चारले की, मला आठवतात, त्यांनी नेसलेल्या महागड्या लफेदार साड्या, हिरे-मोती-माणिक आणि सोन्याचे मॅचिंग नेकलेस, त्याच्यावर तसेच कानातले डूल, साडीला मॅचिंग अशी महागडी ऐटदार पर्स, तीन-चार मोबाइल, दोन-तीन पीए, कुणाच्या हातात मोबाइल, कोणाच्या हातात डायरी तर, कुणाच्या हातात मॅडमसाठी दोन-चार हातरुमालाच्या घड्या…, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पुण्यात शिवसेनेला बापट सेना केले

नीलम गोऱ्हे यांच्या दाव्यानतंर, अनेक लोक अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा भाजपाकडे गेलेले सुद्धा आवर्जून फोन करून सांगत होते की, गोऱ्हे यांनी कशा पद्धतीने निष्ठावान शिवसैनिकांना मातोश्रीपासून दूर ठेवण्याचे कटाक्षाने प्रयत्न केले. पुण्यातले शिवसैनिक सांगतात, कशा पद्धतीने महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये नीलम गोऱ्हे यांचे भाजपाशी आर्थिक हितसंबंध जुळायचे आणि इथली शिवसेना त्यांनी कशी बापट सेना करून ठेवली, असा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Neelam Gorhe : आधी ठाकरेंवर मर्सिडीज घेण्याचा आरोप, नंतर नीलम गोऱ्हेंनी केली सारवासारव



Source link

Comments are closed.