Rahul Narvekar assured that there will be no bias
संबंधित यंत्रणेकडून सात दिवसांच्या आत अधिकृतरीत्या आदेश विधिमंडळाला उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यानंतर त्यानंतर सात दिवसांत विधिमंडळाने यावर अधिसूचना जारी करण्याची अट आहे.
(Manikrao Kokate case) मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या तुरुंगवासावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आमदार सुनील केदार यांना शिक्षा ठोठावल्यानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची आमदारकी रद्द झाली होती. पण माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे विरोधकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लक्ष्य केले आहे. तथापि, या प्रक्रियेची माहिती देताना राहुल नार्वेकर यांनी, पक्षपात केला जाणार नाही, निश्चिंत राहा, असे सांगत आश्वस्त केले आहे. (Rahul Narvekar assured that there will be no bias)
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून नाशिक शहरातील एका अपार्टमेंटमध्ये चार सदनिका माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी घेतल्या होत्या. खोटी कागदपत्रे सादर करून या सदनिका लाटल्याचा कोकाटे बंधूंवर आरोप होता. 1995च्या या प्रकरणात नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडीया यांनी कोकाटे बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षे तुरुंगवास तसेच प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यामुळे मंत्रिपदाबरोबरच आमदारकी जाण्याची टांगती तलवार माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे.
हेही वाचा – Imprisonment of Kokate : …की त्याच्यातही पुन्हा काही सेटिंग ठरली आहे? अंधारेंचे नार्वेकरांवर शरसंधान
याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारले असता ते म्हणाले, 13 ऑक्टोबर 2015 रोजीचे निवडणूक आयोगाच्या नियमांची अधिसूचना आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून सात दिवसांच्या आत अधिकृतरीत्या आदेश विधिमंडळाला उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यानंतर त्यानंतर सात दिवसांत विधिमंडळाने यावर अधिसूचना जारी करण्याची अट आहे. तथापि, याबाबत पक्षपात केला जाणार नाही, निश्चिंत राहा, असे सांगत त्यांनी सर्वांना आश्वस्त केले.
वडेट्टीवार, अंधारे यांची टीका
माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी 24 तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी 24 तासांत त्यांची आमदारकी रद्द केली. आता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश राहुल नार्वेकर कधी काढणार आहे? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
तर, कोकाटे प्रकरणामध्ये राहुल नार्वेकर निकालाच्या प्रतीची वाट बघत आहेत. निकालाची प्रत आल्यावर निर्णय घेऊ, हे त्यांचे म्हणणे म्हणजे धादांत लबाडी आहे. वास्तविक, 38 पानी निकालाची प्रत न्यायालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. वकील असणाऱ्या नार्वेकर यांना सहजासहजी उपलब्ध होत नसेल तर मी द्यायला तयार आहे, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
हेही वाचा – Narwekar about Kokate : कृषीमंत्री माणिकाराव कोकाटेंवर कारवाई कधी? राहुल नार्वेकर म्हणाले –
Comments are closed.