22 पंडित आणि जादूटोण्याने पाकिस्तानचा पराभव? भारतावर आरोप करत, पाक मीडियाच्या हास्यास्पद दावा
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघाला 6 विकेट्सनी पराभूत करून चांगलाच धुवा उडवला. ही हार पाकिस्तान संघासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच निराशाजनक आहे, कारण पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांच्या विजयाच खातं अजूनही उघडलेल नाही. तत्पूर्वीच सेमीफायनल सामन्याचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झालेले दिसून येत आहेत. तसेच सीमारेषेवर काही चाहते निराश झालेले दिसून आले, तर भारतीय चाहत्यांनी आनंद व्यक्त करत जोरात फटाके फोडले.
आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक पाकिस्तानच्या पराभवावर चर्चा करताना दिसून आले आहेत. त्यामध्ये एका व्यक्तीने दावा केला आहे की, भारतीय संघाने जादूटोणा करून पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला आहे.
याविषयीच्या पॉडकास्टवर चर्चेदरम्यान एक व्यक्ती म्हणाला की, भारतीय संघाने त्यांचे 22 पंडित दुबईच्या स्टेडियमवर पाठवले होते. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूसाठी दोन पंडित ठेवण्यात आले होते. की त्यांच्यावर जादूटोणा करत होते. त्याचबरोबर असे देखील म्हणण्यात येत आहे की, त्यामुळेच भारतीय संघ पाकिस्तानच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आला नाही. कारण जर ते पाकिस्तानच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आले असते तर, पंडितांना सोबत घेऊन येता आले नसते. याच 22 पंडितांमुळे पाकिस्तानी खेळाडूंना चांगली खेळी करता आली नाही.
या पॉडकास्ट वर चर्चा थांबली नाही. एका व्यक्तीने चर्चेदरम्यान म्हटले की, सामन्याआधी भारतीय संघाने मैदानावर सात पंडित बोलावले होते. तोपर्यंत भारतीय संघ मैदानावर उतरला नव्हता. असेही म्हणण्यात येत आहे की पंडितांनी जादूटोणा केल्यानंतर भारतीय संघ मैदानावर उतरला.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतामध्ये ठीक ठिकाणी प्रार्थना हवन केले जात होते. वाराणसी ते अयोध्या पर्यंत अनेक संतांनी पूजा हवन केले होते. शेवटी पाकिस्तान संघाला 6 विकेट्सनी भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला. सलग दोन पराभवानंतर पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
हेही वाचा
चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये पाकिस्तानविरूद्ध शतक ठोकणारे 4 फलंदाज! ‘किंग’ कोहलीचाही समावेश
विराट कोहलीच्या शतकाने हादरला पाकिस्तान! पाकिस्तान कर्णधार म्हणाला, “जग म्हणत आहे…”
“भारतीय युवा स्टारला पाकिस्तानी दिग्गजाने दिली दाद, काय म्हणाले वसीम अकरम?”
Comments are closed.