Sharad Pawar will talk about Neelam Gorhe statement in the press conference or not


राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सोमवारी (ता. 24 फेब्रुवारी) सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते नेमके कोणत्या विषयावर भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मुंबई : दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमातून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा गंभीर आरोप नीलम गोऱ्हेंनी केला. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर साहित्य संमेलनाच्या मंचावरून झालेल्या या चिकलफेकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा जबाबदार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शरद पवार याबाबत काही बोलणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Sharad Pawar will talk about Neelam Gorhe statement in the press conference or not)

राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सोमवारी (ता. 24 फेब्रुवारी) सायंकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते नेमके कोणत्या विषयावर भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण यंदाच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद हे शरद पवारांकडे होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यामुळे आता नीलम गोऱ्हेंच्या विधानाबाबत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी किंवा या विधानाचा विरोध काही तरी बोलावे, असे मत शिवसेना ठाकरे गटाकडून आणि विशेषतः खासदार संजय राऊतांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आज सायंकाळची पत्रकार परिषद कोणत्याही कारणासाठी असली तरी शरद पवार नीलम गोऱ्हेंच्या विधानाबाबत काही बोलतात की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : ‘साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार,’ संजय राऊतांचा संताप

शरद पवारांबाबत काय म्हणाले संजय राऊत?

साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी शरद पवार सुद्धा झटकू शकत नाहीत. शरद पवार ज्येष्ठ आहेत. ते साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवार सुद्धा जबाबदार आहेत, असा आरोपच खासदार संजय राऊतांनी केला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी सुद्धा गोऱ्हेंच्या विधानाचा निषेध व्यक्त केला पाहिजे. शरद पवार यांच्यावर चिखलफेक झाल्यावर आम्ही सुद्धा उभे राहतो. नीलम गोऱ्हे ही कोण बाई आहे. हे कोणते भूत आहे. साहित्य संमेलनच्या मंचावरून गरळ ओकते. मराठी साहित्य आणि भाषेचे नुकसान या लोकांमुळे झाले, अशी टीका राऊतांनी केली आहे.



Source link

Comments are closed.