Narendracharya Maharaj filed a complaint against Vijay Wadettiwar at the Mumbai Suburban District Collectorate


मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करणारे महाराज होऊ शकत नाही, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल केले. त्यांच्या या विधानाप्रकरणी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे नरेंद्रचार्य महाराज स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आज तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई : मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करणारे महाराज होऊ शकत नाही, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल केले. त्यांच्या या विधानाप्रकरणी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी, अशी मागणी करत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे शिष्य आणि भक्त राज्यभर आंदोलन करताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे नरेंद्रचार्य महाराज स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आज तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Narendracharya Maharaj filed a complaint against Vijay Wadettiwar at the Mumbai Suburban District Collectorate)

जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाबाबत आज त्यांच्या भक्तांकडून विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नाशिकमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. भक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यलयासमोर आंदोलन केले. यावेळी वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडेही मारण्यात आले. तर दुसरीकडे पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला केले जोडे मारो आंदोलन करण्यात आले. विजय वडेट्टीवार यांनी तातडीने राज्याची माफी मागावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भक्तांकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा –Sushama Andhare : गोऱ्हेंनी पहिल्या आमदारकींसाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या? अंधारेंचा सवाल

नरेंद्राचार्य महाराज आज दुपारी बारा वाजता मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. नरेंद्राचार्य महाराज स्वत: येणार असल्याने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भक्तांनी जमण्यास सुरुवात केली होती. यावेळी भक्तांच्या हातात काही फलके होते, ज्यावर वडेट्टीवार यांच्या फोटोसह निषेध असे लिहिण्यात आले होते. तर काही फलकांवर माफी मागा असे लिहिले होते. यावेळी मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील नरेंद्रचार्य महाराजांसोबत तक्रार दाखल करण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे आता नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी विजय वडेट्टीवार नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून…; ठाकरे गटाकडून खळबळजनक आरोप



Source link

Comments are closed.